Margao Gold Theft Case X
गोवा

Banavali Crime: आधी विश्वास संपादन केला, मग ‘हात की सफाई’, 3 कारागिरांनी पळवले ७२ लाखांचे सोने

Margao Gold Theft Case: बाणावली येथील एका सराफ व्यावसायिकाच्या कारखान्यात सोन्या-चांदीचे दागिने बनविणाऱ्या मूळ पश्चिम बंगाल राज्यातील तीन कारागिरांनी आपल्याच मालकाला ‘हात की सफाई’चा इंगा दाखवत तब्बल ७२ लाख रुपये किमतीचे सोने पळविले.

गोमन्तक डिजिटल टीम

Comba Margao Gold Theft Case

मडगाव: बाणावली येथील एका सराफ व्यावसायिकाच्या कारखान्यात सोन्या-चांदीचे दागिने बनविणाऱ्या मूळ पश्चिम बंगाल राज्यातील तीन कारागिरांनी आपल्याच मालकाला ‘हात की सफाई’चा इंगा दाखवत तब्बल  ७२ लाख रुपये किमतीचे सोने पळविले.

मडगाव शहरातील कोंब भागात ही घटना घडली. याप्रकरणी बाणावली येथील प्रीतेश लोटलीकर हे तक्रारदार  असून, पश्‍चिम बंगालचे तीन कारागीर त्यांच्या कारखान्यात दागिने बनविण्याचे काम करत होते. ते तिघे अनेक वर्षे लोटलीकर यांच्याकडे काम करत असल्याने त्यांनी लोटलीकर यांचा विश्‍वास संपादन केला होता. त्या कारागिरांनीही बरीच वर्षे प्रामाणिकपणे त्यांच्याकडे काम केले. त्यामुळे लोटलीकरही निर्धास्त होते. मात्र, अखेरीस त्यांनी आपल्या मालकाशीच दगाफटका केला. या तिघांनी लोटलीकर यांचे सुमारे ७२ लाख रुपये किमतीचे ९५९ ग्रॅम सोने चोरून पळ काढला.

शनिवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर लोटलीकर यांनी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार  दाखल नोंदविली.  सुप्रोकोश  मोंडल (वय २९ वर्षे), संजॉय मोंडल (वय २२ वर्षे) आणि तपस जना (४४) अशी या तिघा संशयितांची नावे  आहेत. या कारागिरांचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांचे  एक पथक पश्चिम बंगालला  रवाना  झाले आहे. मडगाव  पोलिसांनी  कलम ३१६ अंतर्गत हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम गावकर  पुढील तपास  करीत आहेत.

सराफ व्यावसायिक धास्तावले

सोने चोरीच्या या प्रकारामुळे मडगाव शहरातील सराफ व्यावसायिक धास्तावले आहेत. कारण येथील बहुतांश व्यावसायिकांकडे दागिने बनविणारे कारागीर हे पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. त्यामुळे अनेक सराफ व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT