goa Cashews
goa Cashews 
गोवा

गोव्यातून संपूर्ण भारतात दोन हजार तर विदेशात एक हजार टन काजूची निर्यात होणार

गोमन्तक वृत्तसेवा

सासष्टी: गोव्याच्या(Goa) काजूची(Cashews) चव संपूर्ण जगात(World) कुठेही नाही. त्यामुळे गोव्याला भेट देणारे पर्यटक(Tourism) काजू घेतल्याशिवाय जात नाहीत.  येथील काजूगर परदेशातही निर्यात केला जात आहे. गोव्यातून प्रक्रिया केलेल्या काजूची निर्यात या महिन्यात होणार असून विदेशात एक हजार, संपूर्ण भारतात दोन हजार टन काजूची निर्यात होणार आहे. भारतात 2021-22 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था(economic system) वेगाने पुनरुज्जीवित होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत असल्यामुळे भारतात(India) काजूला मागणी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोवा काजू उत्पादक संघटनेचे खजिनदार सिध्दार्थ झांट्ये यांनी दिली. (Three thousand tons of cashew nuts will be exported from Goa)

कोविडची दुसरी लाट आली, त्यात  तौक्ते चक्रीवादळचा तडाखा बसल्याने यंदा प्रक्रिया केलेला काजूगर विदेशात तसेच भारतात निर्यात करण्यास अद्याप शक्य झाले नाही. आता या महिन्यात प्रक्रिया केलेल्या काजूची निर्यात करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी कोविडच्या आधी काजूची निर्यात करण्यात आल्यामुळे 2019-20 या आर्थिक वर्षात निर्यात वाढली होती. 2020-21 या आर्थिक वर्षात काही प्रमाणात निर्यात कमी झाली होती, तर यंदाही निर्यात समान राहणार आहे, असे सिध्दार्थ झाट्ये यांनी सांगितले.  

भारतात 2021-22 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत असल्यामुळे यंदा भारतात काजूला मागणी वाढणार आहे. राज्यात वाढणारे कोरोनाबाधित रुग्ण व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूसंख्येवर लक्ष केंद्रीत करुन कर्फ्यू लागू करण्यात आला होता. कफ्यूमध्ये औद्योगिक क्षेत्रात बंदी नव्हती. पण, गावगावात कोरोना पसरल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे कामगार कामावर येत नव्हते. कोरोनामुळेसण, समारंभ, कार्यक्रम आदींवर रोख असून पर्यटन व्यवसायही पूर्णपणे ठप्प झालेला होता. गेल्या वर्षी गोव्यात प्रक्रिया केलेल्या काजूला मागणी कमी झाली होती, तर यंदा निर्बंध हटविल्यानंतर काही प्रमाणात मागणी वाढणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

SCROLL FOR NEXT