Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सोनसाखळी हिसकावणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना अटक; टोळी सक्रिय असल्‍याचा संशय

डिचोलीतील प्रकार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime खासगी बसमधून प्रवास करताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या तीन संशयित बांगलादेशी महिलांना डिचोली पोलिसांनी अटक केली आहे. बसचालक सूरज मोरजकर यांनी तत्परता दाखवल्यानेच या संशयित महिलांना पकडणे शक्य झाले.

सिंधू जयचंद्र (३५), संजना मरमुथू (४०) आणि सलगमी कुमार (५०) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांनी दिल्ली येथील रहिवासी असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

सदर घटना आज बुधवारी म्हापसा ते वाळपई मार्गावर वाहतूक करणाऱ्या एका खासगी प्रवासी बसमध्ये मुळगाव ते डिचोलीदरम्यान घडली. डिचोली पोलिसांनी संशयित महिलांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

मानेवर ओढणी टाकून साधली संधी

शिवोलकरवाडा-मुळगाव येथील 62 वर्षीय दीपाली वायंगणकर या ज्येष्ठ महिला मुळगाव येथे बसमध्ये चढल्या. त्या डिचोलीत जात होत्या. मात्र वाटेत संशयितांपैकी एका महिलेने दीपाली यांच्या मानेवर ओढणी टाकून त्‍यांच्या गळ्‍यातील सुमारे एक लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली. हा प्रकार दीपाली यांच्या लक्षात येताच त्‍यांनी आरडाओरड केली.

बसचालकाने तत्‍परतेने संशयितांना पकडले

प्रवासी बस बोर्डे-डिचोली येथे पोचताच बसमध्ये गोंधळ झाला. त्यामुळे बसचालकाने बस बोर्डे येथे थांबवली. या संधीचा फायदा घेत तिन्ही संशयित महिला बसमधून उतरल्या आणि पळू लागल्या.

मात्र बसचालक सूरज मोरजकर यांनी पाठलाग करून अन्य लोकांच्या मदतीने त्‍यांना पकडले. या महिला बोर्डे येथे एका इमारतीच्या मागच्या बाजूने लपण्याच्या प्रयत्नात होत्या. बसचालक मोरजकर यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Election Commission: निवडणूक आयोग घेणार सज्जतेचा आढावा, विशेष बैठका घेणार; 7 ते 8 ऑक्टोबर दरम्यान गोवा दौरा

Sanjivani Sugar Factory: साखरेसोबतच इथेनॉल निर्मितीचेही पूर्ण स्वातंत्र्य! खासगी एजन्‍सीला 'संजीवनी'चे पीपीपी तत्त्वावर 30 वर्षांचे कंत्राट

Goa Health Checkup: राज्यातील तपासणी शिबिरांत 20 जणांना कर्करोगाचे निदान, साडेपाच हजार जणांची आरोग्य तपासणी

Griha Aadhar Scheme: विधानसभा निवडणुकीपूर्वीच 'गृहआधार' मानधनात होणार वाढ, डिचाेलीतील नारी शक्ती महोत्सवात CM प्रमोद सावंतांची घोषणा

Horoscope: रविवारचे राशीभविष्य: सूर्यदेवाच्या कृपेने 'या' 3 भाग्यशाली राशींना मिळणार आनंदाची बातमी, धनलाभासह प्रगतीचे योग

SCROLL FOR NEXT