Self Destruction Cases Canva
गोवा

Bicholim: चिंताजनक..! चार दिवसांत तिघांनी संपवले जीवन; डिचोलीत खळबळ

Bicholim News: गेल्या चार दिवसांत आत्महत्येच्या तीन घटना घडल्याने डिचोलीत खळबळ माजली असून सर्वसामान्य लोकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. डिचोली पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एका विवाहितेसह दोन युवकांनी आत्महत्या करण्याचे प्रकार घडले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: गेल्या चार दिवसांत आत्महत्येच्या तीन घटना घडल्याने डिचोलीत खळबळ माजली असून सर्वसामान्य लोकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. डिचोली पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एका विवाहितेसह दोन युवकांनी आत्महत्या करण्याचे प्रकार घडले आहेत.

चार दिवसांपूर्वी विषप्राशन केलेल्या कातरवाडा-धबधबा येथील एका विवाहितेचे सोमवारी रात्री गोमेकॉत उपचारादरम्यान निधन झाले, तर काल (बुधवारी) साखळी येथे भर बाजारात गजानन वांतेकर या विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी मांद्रेकरवाडा-डिचोली येथे एका अविवाहित युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना उघडकीस आली आहे.

लागोपाठ घडलेल्या या आत्महत्या प्रकरणामागील नेमकी कारणे स्पष्ट होऊ शकली नसली, तरी याबद्दल अनेकांनी खेद व्यक्त केला आहे. तिन्ही आत्महत्यांची पोलिसात नोंद झाली असून, याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT