Goa: गोव्यात तीन राष्‍ट्रीय परिषदा Dainik Gomantak
गोवा

गोव्यात तीन राष्‍ट्रीय परिषदा

या परिषदा 8 ते 12 नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत होणार आहेत

दैनिक गोमन्तक

पणजी : 'सेलिब्रेशन ऑफ डेमोक्रसी'चा एक भाग म्हणून गोव्‍याने (Goa) तीन राष्‍ट्रीय परिषदांचे (National Conferences) आयोजन करून आपल्या मुक्तीची 60 वर्षे साजरी करण्याचा ऐतिहासिक प्रवास सुरू केला आहे. पुणे एमआयटी सरकारी विद्यालय व भारतीय छात्र संसद यांचे त्‍यास सहकार्य लाभले आहे.

या परिषदा 8 ते 12 नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्‍हणून तर सभापती राजेश पाटणेकर अध्यक्ष म्‍हणून उपस्‍थित असतील.

राहुल कराड हे तिन्ही परिषदांचे निमंत्रक आहेत. महिला, युवक आणि ग्रामीण भाग अशा आपल्या देशाच्या तीन महत्त्वाच्या स्तंभांवर लक्ष केंद्रित करून गोवा विधानसभेने या प्रत्येक विभागातील आव्हाने आणि संभाव्यतेला तोंड देण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे.

या परिषदांना प्रतिष्ठित राष्ट्रीय नेतृत्व, विद्वान शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, व्यापारी, परोपकारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रख्यात वक्ते आणि विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित राहतील.

परिषदांचे विषय

7 व 8 नोव्‍हें : लोकशाहीच्या उत्सवात महिला सक्षमीकरणाला स्‍थान.

9 व 10 नोव्‍हें : नॅशनल यूथ पार्लमेंट.

11 नोव्हें : गावांच्या सक्षम विकासासाठी उपाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT