Three more corona positive patients die in Go
Three more corona positive patients die in Go 
गोवा

गोव्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात आज आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात आजवर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ६९६ इतकी झाली आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनाबाबतची स्थिती सुधारत असल्याचेही चित्र पहायला मिळत आहे. कारण आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्याचा कोरोनाबाबतचा रिकव्हरी रेट ९५.६३ टक्के इतका आहे.


आज ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यामध्ये केपे येथील ५८ वर्षीय महिला, वेर्णा येथील ८५ वर्षीय पुरुष आणि मडगाव येथील ३५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. यातील दोन मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणि एक मृत्यू हॉस्पिसिओ येथे झाला आहे.  


आज दिवसभरात १२४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ११९ जण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्यात चौदाशे अठरा सक्रिय रुग्ण आहेत. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील कोविड इस्पितळांमध्ये उपचारासाठी पुरेशी जागा शिल्लक आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात खाटांची संख्या २७५ इतकी असून सध्या २२५ खाटा वापरासाठी उपलब्ध आहेत, तर दक्षिण गोव्यात ६० इतकी खाटांची संख्या असून सध्या ४४ खाटा उपलब्ध आहेत. आज दिवसभरात ५० लोकांनी गृह अलगीकरणाचा पर्याय स्वीकारला तर ३८ लोकांना इस्पितळात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आज दिवसभरात एक अठराशे नव्वद इतके लाळेचे नमुने तपासण्यात आले.


दरम्यान, डिचोली आरोग्य केंद्रात २८ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात २७ रुग्ण, म्हापसा आरोग्य केंद्रात ५५ रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात ६४ रुग्ण, पर्वरी आरोग्य केंद्रात १०२ रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात १२२, फोंडा आरोग्य केंद्रात १०२ रुग्ण, केपे आरोग्य केंद्रात २९ रुग्ण तसेच राज्यात इतर ठिकाणीसुद्धा रुग्ण उपचार घेत आहेत.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT