Leopard Trapped in Cage Dainik Gomantak
गोवा

Goa Leopards: दीड वर्षात 3 बिबटे जाळ्यात, संचार वाढल्याने दहशत; 'त्या' बिबट्याचे गूढ कायम

Leopard In Goa: गेल्या वर्षी जानेवारी महिन्याच्या १३ तारखेला आणि गेल्या रविवारी (ता. १९) मिळून धबधबा परिसरात एकाच ठिकाणी दोन बिबटे पकडण्यात वन खात्याला यश आले.

Sameer Panditrao

Goa Leopard Incident

डिचोली: धबधबा परिसरात दहशत घातलेला बिबटा सापळ्यात सापडला असला, तरी बोर्डे येथे जखमी झालेला तो बिबटा अजून काही सापडत नाही.

दरम्यान, धबधबा येथे दोन आणि शहराजवळील मुळगाव येथे एक मिळून गेल्या दीड वर्षात आतापर्यंत तीन बिबटे वन खात्याच्या सापळ्यात अडकले आहेत. तर गेल्या दहा-बारा वर्षांत दोन बिबट्यांचे अपघाती बळी गेले आहेत. यावरून डिचोली परिसरात बिबट्यांचा संचार वाढला असल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकवस्तीजवळ बिबट्यांचा वावर असल्यामुळे डिचोलीतील काही भागात भीतीचे वातावरण कायम आहे. दीड वर्षांपूर्वी डिचोली शहराला जोडून असलेल्या मुळगाव येथे एका बिबट्याची दहशत वाढली होती. अखेर २०२३ साली ऑगस्ट महिन्याच्या १४ तारखेला मध्यरात्री हा बिबट्या वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला होता. त्यानंतर गेल्या वर्षी जानेवारी महिन्याच्या १३ तारखेला आणि गेल्या रविवारी (ता. १९) मिळून धबधबा परिसरात एकाच ठिकाणी दोन बिबटे पकडण्यात वन खात्याला यश आले. दीड वर्षात तीन बिबटे फसले असले, तरी तालुक्यातील काही भागात अजूनही बिबट्यांची दहशत आहे.

जखमी बिबट्याचे गूढ

३ जानेवारी रोजी डिचोली-व्हाळशी मुख्य रस्त्यावरील साष्टीवाडा येथे कारला आपटल्याने एक बिबट्या जखमी झाला आहे. अपघातानंतर तीन ते चार दिवस हा बिबट्या साष्टीवाडा परिसरात फिरताना अनेकांच्या नजरेला पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT