Car Accident 

 

Dainik Gomantak 

गोवा

कार अपघातात तिघांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनूसार, कारमध्ये पाच जण होते. त्यातील तीन जण जागीच ठार झाले. दोघांची प्रकृती गंभीर आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: वेर्णाहून दाबोळीकडे जात असलेल्या एका कारला झालेल्या अपघातात तिघे जागीच ठार झाले. ही घटना गुरुवारी रात्री 10:30च्या सुमारास घडली. सांकळवाळ चौपदरी रस्त्यावर भरधाव वेगाने ही कार जात होती. त्यातून हा कारचा अपघात (Accident) झाल्याचा अंदाज आहे. या घटनेत कारचा (Car) चेंदामेंदा झाला.

मिळालेल्या माहितीनूसार, कारमध्ये पाच जण होते. त्यातील तीन जण जागीच ठार झाले. दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची नावे कणन, नितीन, विष्णु अशी असून ते तिघेही केरळ येथील आहेत. यातील एक जण हा दाबोळी विमातळावर (Daboli Airport) आणि एक जण भारतीय नौदलात होता. हे दोघेही वास्को (Vasco) येथे राहत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. जखमींची नावे विनोद कुमार आणि अखिल अशी आहे. त्यांची पूर्ण नावे मात्र कळू शकली नाही.जखमी प्रवाशांना स्थानिकानी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिस रात्री उशिरापर्यंत या घटनेचा तपास करत होते. अपघाताचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

Goa Youth Protest: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

SCROLL FOR NEXT