indian gaur Dainik Gomantak
गोवा

हणखणे येथे तिलारी कालव्यात तीन गवे पडले

एका गव्याला बाहेर काढण्यात वनखात्याला यश

Sumit Tambekar

गोव्यातील अनेक गावांना पुरेसा पाणी पुरवणाऱ्या तिलारी धरण्याच्या कालव्यात हणखणे तालुका पेडणे येथे तीन गवा रेडे पडल्याची घटना घडली आहे. पाणी पिण्याच्या निमित्ताने कालव्यात उतरलेले गवे पुन्हा पाण्यातून बाहेर येऊ शकले नाहीत. याची माहिती मिळताच वनखात्याने घटनास्थळी धाव घेत गव्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र तीन पैकी एकाच गव्याला बाहेर काढण्यात वनखात्याला यश आले असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेच्या दोन तासानंतर मिळालेल्या माहितीनुसार वन खात्याने या तिलारी कालव्यात पडलेल्या तीन ही गवा रेड्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष पथक नेमले असून पथकाला यात यश आले आहे. यामूळे तीन ही गवा रेड्यांना कालव्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. अशी माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच दिली आहे.

indian Gaur

स्थानिक नागरिकांच्या मदतीने गव्याला बाहेर काढताना वनखात्याचे कर्मचारी

यापूर्वीही याच कालव्यात गवे पडल्याच्या घटना

पूर्वीही या कालव्यात गवे पडल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र तरीही प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना आखली गेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या भागात गव्यांचा वावर असल्याने कालव्यात पडल्यास त्यांना बाहेर काढण्यासाठी वनविभागाला तारेवरची कसरत करावी लागते. असे असताना ही प्रशासन याबाबतीत का दुर्लक्ष करते आहे. असे मत स्थानिकांनी नोंदवले.

गोव्यातील 3,500 पेक्षा जास्त EV साठी केवळ 3 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन

पणजी: इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) घेण्याच्या विचाराने गोवावासीयांवर शुल्क आकारले जात असतानाही, लोकांना आवश्यक चार्जिंग पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात राज्य सरकारचा रस मात्र निराशाजनक आहे. सध्याच्या विधानसभेच्या अधिवेशनात प्रदान केलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की सध्या परिवहन विभागाकडे नोंदणीकृत 3,527 ईव्हीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ तीन सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सची स्थापना करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT