Tree Plantation Dainik Gomantak
गोवा

तीनशेजणांनी घेतला रोपटी वाटपाचा लाभ

फळांच्या रोपट्यांची लागवड करा ः दिलायला लोबो

दैनिक गोमन्तक

कळंगुट : जागोजागी वितरीत करण्यात येत असलेल्या फळ देणाऱ्या रोपट्यांचा ग्रामस्थांनी लाभ घेऊन लागवड करावी व पर्यावरण संतुलन राखण्यास मदत करावी, असे प्रतिपादन आमदार दिलायला लोबो यांनी शिवोली येथे आयोजित कार्यक्रमात केले.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आदेशानुसार राज्यातील विविध पंचायतीत फुले तसेच फळांच्या रोपट्यांचे वाटप करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा राज्यातील अधिकाधिक लोकांनी फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिवोलीतील कार्यक्रमापूर्वी वेर्ला-काणका पंचायत तसेच संध्याकाळी आसगाव पंचायत कार्यालयात त्यांच्या हस्ते रोपटी वाटपाचे कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांचा जवळपास तीनशेहून अधिक कुटुंबांनी लाभ घेतल्याचे आमदार लोबो यांनी सांगितले. जून महिन्यात झालेल्या जोरदार वादळी पावसाने परिसरातील झाडे कोसळून घरांची मोठ्या प्रमाणात हानी झालेल्या चोडणकर कुटुंबीय तसेच मधलेभाट शिवोली येथील शॉर्ट सर्किटमुळे घरात आग भडकून वित्तहानी झालेल्या हडफडकर कुटुबीयांना मुख्यमंत्री निधीतून आर्थिक साहाय्य करण्यात आले. यावेळी मार्ना-शिवोलीच्या माजी सरपंच शर्मिला वेर्णेकर, ओशेल पंचायतीचे माजी उपसरपंच मंगेश चोडणकर, प्रवीण कोचरेकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'ओपन जेल'साठी राजस्‍थान दौरा; कोर्टाचे गृह विभागाला निर्देश, कारागृह नियम दुरुस्तीसाठी समिती

NEET Exam: साडेचार हजार विद्यार्थी देणार 'नीट' परीक्षा; सरकारी यंत्रणा सज्ज, परीक्षा केंद्रांवर कदंबची विशेष बससेवा

Kisan Credit Card Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आरबीआयने 'किसान क्रेडिट कार्ड'च्या नियमात केला मोठा बदल; कधीपासून होणार लागू?

Goa Police: पीएसआय पदे तात्काळ भरा, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना न्याय द्या; गिरीश चोडणकरांची मागणी

Khazan Farming: एकात्मिक शेती पीक: मेरशीतील खाजन शेतीत अभिनव प्रयोग, आयसीएआरच्या ‘लँड-शेपिंग’ मॉडेलचा वापर

SCROLL FOR NEXT