Three arrested in murder case in Goa  Dainik Gomantak
गोवा

सहकाऱ्याच्या खूनप्रकरणी तिघांना अटक, एक फरारी

सांताक्रुझ येथील फ्लॅटमध्ये एकत्र राहत असलेल्या सहकाऱ्यांनीच उत्तम पटेल याचा खून करण्यात आल्याने जुने गोवे पोलिसांनी तीन सहकाऱ्यांना रात्री उशिरा अटक केली

दैनिक गोमन्तक

पणजी: सांताक्रुझ येथील फ्लॅटमध्ये एकत्र राहत असलेल्या सहकाऱ्यांनीच उत्तम पटेल याचा खून करण्यात आल्याने जुने गोवे पोलिसांनी तीन सहकाऱ्यांना रात्री उशिरा अटक केली तर एकजण फरारी आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. या तिघांना आज संध्याकाळी न्यायालयासमोर उभे करून पोलिस कोठडी घेण्यात येणार आहे. (Three arrested in murder case in Goa)

उत्तम पटेल याच्या खूनप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी (Goa Police) खुनाच्या (Murder Case) आरोपाखाली संशयित विश्‍वजित नवले (महाराष्ट्र), चंदन मुखर्जी ( पश्‍चिम बंगाल), शिवराम गोंड (उत्तर प्रदेश) अटक केली आहे तर देवेंद्र यादव (उत्तर प्रदेश) हा फरारी आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. गेल्या रविवारी जुने गोवे पोलिसांनी पटेल याच्या मृत्यूप्रकरणी शव चिकित्सा झाली नसल्याने अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. मयत पटेल याचे नातेवाईक गोव्यात पोहचल्यानंतर काल शव चिकित्सा करण्यात आली त्यामध्ये न्यायवैद्यक डॉक्टरांनी त्याचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष अहवालात नमूद केल्याने खुनाचा गुन्हा नोंद केला असल्याची माहिती जुने गोवे पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांनी दिली.

उत्तम पटेल याच्यासह संशयित हे सांताक्रुझ येथील एका फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. हे सर्वजण मोबाईल टॉवरसाठी केबल टाकण्याचे काम करत होते. गेल्या शनिवारी (५ मार्च) फ्लॅटवर या सर्वांनी रात्री पार्टी केली होती. त्यावेळी त्यांच्यात कामाच्या पैशाच्या वादातून मद्याच्या नशेत बाचाबाची झाली होती. त्याचे पर्यावसान उत्तम पटेल व देवेंद्र यादव यांच्यात झालेल्या मारहाणीत झाले. या मारहाणीनंतर उत्तम पटेल बेशुद्ध पडला मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे त्यावेळी त्याच्या सहकाऱ्यांना वाटले नाही.

सकाळी पटेल याला त्याचे सहकारी उठवण्यासाठी गेले असता तो हालचाल करत नव्हता. त्यामुळे घाबरलेल्या त्याच्या सहकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती जुने गोवे पोलिसांना दिली. विश्‍वजित नवले, चंदन मुखर्जी व शिवराम गोंड हे तिघे फ्लॅटवर होते तर देवेंद्र यादव हा भीतीनेच तेथून पसार झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह शव चिकित्सेसाठी गोमेकॉ इस्पितळात पाठवून दिला. मृतदेहावर मारहाणीची एकही जखम नव्हती. उत्तम पटेल याच्या कुटुंबियासाठी पोलिसांनी संपर्क साधून त्यांना गोव्यात (Goa Crime) येण्यास सांगितले. तोपर्यंत मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता. काल पटेल याचे नातेवाईक आल्यावर पोलिसांनी त्यांच्या समक्ष मृतदेहाचा पंचनामा केला व शव चिकित्सा करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT