Three arrested in Mapusa theft case Dainik Gomantak
गोवा

म्हापसा चोरीप्रकरणी तिघांना अटक

संशयितांना पहाटे अडीचच्या सुमारास अटक

दैनिक गोमन्तक

म्हापसा: मरड-म्हापसा येथील मासळी मार्केटच्या परिसरात असलेल्या रिझीम प्लाझा इमारतीतील चार कार्यालयांत झालेल्या चोरीप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी चोवीस तासांच्या आत अटक करण्यात यश मिळवले. या घटनेत चोरट्यांनी सुमारे पंचवीस हजारांची रोकड व चार मोबाइल संच लंपास केले होते.

याप्रकरणी रमेश सत्या (37, विजापूर-कर्नाटक), संजय बाने (26, लातूर-महाराष्ट्र) व महम्मद शेख (28, गदग-कर्नाटक) या तिघांना अटक केली आहे. म्हापसा परिसरातून या तिघांना अटक करून न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावली. संशयितांना 6 रोजी पहाटे अडीचच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन मोबाईल तसेच पंधरा हजारांची रोकड ताब्यात घेण्यात आली. चोरीस गेलेली अन्य रक्कम त्या संशयितांनी खर्च केल्याचे पोलिसांना आढळून आले. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोबीत सक्सेना, उपअधीक्षक उदय परब व पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापसा पोलिसांनी ही कारवाई केली.

या चोरीप्रकरणी शेट्येवाडा-धुळेर येथील बाबल धारगळकर या व्यावसायिकाने 5 मे रोजी म्हापसा पोलिसात तक्रार दिली होती. बाबल धारगळकर, ॲड. शंकर चोडणकर, ॲड. विनिशा ब्रागांझा फ्रांसिस्को सिल्वेरा यांच्या कार्यालयांच्या दाराची कुलूपे तोडून तेथील रोकड व मोबाईल मिळून 70 हजारांचा ऐवज पळवला होता. या प्रकरणी म्हापसा पोलिसात गुन्हा नोंदवल्यानंतर महिला पोलिस उपनिरीक्षक विभा वळवईकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस चौकशी सुरू होती. हेड कॉ.आल्वितो डिमेलो व सुशांत चोपडेकर, कॉ. राजेश कांदोळकर, प्रकाश पोळेकर, अभिषेक कासार, अक्षय पाटील, लक्ष्मीकांत नाईक, आनंद राठोड, वामन पालयेकर, सुरेंद्र गावस व संदेश नागोजी यांनी कारवाईत भूमिका बजावली. तिन्ही संशयितांना तीन दिवसांपूर्वीच कोलवाळ कारागृहातून जामिनावर सोडण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT