Crime News Dainik Gomantak
गोवा

वास्‍कोतील सुरीहल्ला प्रकरणी तिघांना अटक

हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असण्याची शक्यता आहे. मोहम्मद रफिक सय्यद (24) व गौस निजामुद्दीन सय्यद (19) अशी जखमींची नावे आहेत.

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्कोत बुधवारी रात्री तिघांकडून दोघा युवकांवर सुरीहल्ला करण्यात आला होता. हल्ला केलेल्यांमध्ये दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश असून पोलिसांनी त्‍यांना अटक केली आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असण्याची शक्यता आहे. मोहम्मद रफिक सय्यद (24) व गौस निजामुद्दीन सय्यद (19) अशी जखमींची नावे आहेत.

(Three arrested in knife attack case in goa)

गोस याला गंभीर जखमा झाल्‍या आहेत.

मिळालेल्‍या माहितीनुसार, सुरी हल्ल्याची ही घटना बुधवारी रात्री एकच्या सुमारास शांतीनगर-वास्को भागात घडली. जखमी युवक मोहम्मद व गौस हे मित्र असून नवेवाडेतून ते एका नातेवाईकाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शांतीनगरात आले होते. रात्री एकच्या सुमारास ते कार्यक्रम आटोपून घरी जात होते.

मात्र, हल्लेखोरांनी त्यांना वाटेतच अडवले व त्‍यांच्‍यावर सुरीहल्ला चढवला. मोहम्मदच्या हातावर तर गौस याच्या हातासह पोटावर, चेहऱ्यावर व शरीरावर इतर ठिकाणी जखमा झाल्‍या आहेत. त्याला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले. दरम्‍यान, या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह तीन संशयित आरोपींना वास्को पोलिसांनी अटक केली आहे. वास्कोचे पोलिस उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कपिल नायक अधिक तपास करत आहेत.

शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू

वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच रस्त्यांवर मद्यपान करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी वास्को पोलिसांनी काल शुक्रवारी सायंकाळी वास्को व परिसरात कडक बंदोबस्त ठेवून नाकाबंदी केली. मांगूरहिल, नवेवाडे, साईनगर, शांतीनगर आदी परिसरात ही मोहीम राबवून येणाऱ्या-जाणाऱ्यांची झडती घेण्‍यात आली. अचानक घडलेल्‍या या प्रकारामुळे नागरिकांत मात्र संभ्रम निर्माण झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT