Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: जेसीबी चोरीप्रकरणी तिघांना अटक

ओव्हर-राइडिंग इग्निशन सिस्टीमद्वारे या जेसीबी मशीनची चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले.

गोमन्तक डिजिटल टीम

जेसीबी मशिन चोरीप्रकरणी कोलवळ पोलिसांनी आज तिघांना अटक केलीय. या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, यमनूर कडकल यांच्या मालकीचे जेसीबी मशीन माडेल हाऊसिंग बोर्ड येथून अज्ञात व्यक्तींनी चोरून नेले होते. या संबंधी एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांच्याकडे या प्रकरणाविषयी भादंवि कलम 379 अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला होता.

या प्रकरणाचा शोध घेण्याकरिता स्थानिक गुप्तचर टीम तैनात आली होती. त्यानुसार रवी धीरप्पा चव्हाण, (रा. साई कॉलनी- माडेल), रवी धकप्पा राठोड (रा. साई कॉलनी, माडेल) आणि प्रकाश सोमू राठोड (सर्व मूळचे कर्नाटकातील रहिवासी ) या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ओव्हर-राइडिंग इग्निशन सिस्टीमद्वारे या जेसीबी मशीनची चोरी केल्याचे कबूल केले. या कृत्यासंदर्भात त्या आरोपींना अटक करून 03 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी S.P. यांच्या देखरेखीखाली संपूर्ण तपास करण्यात आला. शिवेंदू भूषण, आयपीएस, एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी, पीआय कोलवाळ, PSI कुणाल नाईक, HC- 5777 पांडुरंग नाईक, PC-6340 सुलेश नाईक यांनी या तपास कामात सक्रिय सहभाग घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT