Sanjivani Sugar Factory  Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory: संजीवनीसंदर्भात निर्णय घ्या अन्यथा पुन्हा आंदोलन

Sanjivani Sugar Factory: ऊस उत्पादक संघटना: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाबाबत नाराजी

दैनिक गोमन्तक

Sanjivani Sugar Factory:

सरकार शेतकऱ्यांना कारखाना सुरू करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची अद्याप हालचाल करत नसल्याने संजीवनीच्या ऊस उत्पादक संघटनेने नाराजी व्यक्त केली असून 1 मार्चपर्यंत कारखान्यासंदर्भात निर्णय न घेतल्यास आम्ही पुन्हा आंदोलन करू, असा इशारा ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी त्यांच्यासोबत फ्रान्सिस मास्करेन्हस, हर्षल प्रभुदेसाई, गुरू गाड, दयानंद फळदेसाई तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आम्ही आझाद मैदानावर आंदोलन केले, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कारखाना लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे सांगितले होते, पण आत्ता दोन महिने उलटून गेले तरी सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही, असे देसाई म्हणाले.

2020 मध्ये सरकारने ऊस उत्पादक सुविधा समिती नेमली होती. त्यामध्ये संघटनेचे सर्व पदाधिकारी या समितीत होते. या समितीचे अध्यक्षपद ॲड. नरेंद्र सावईकर यांच्याकडे होते.

त्यांनीही शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. या समितीत राहून आमचे भले होत नाही, तेव्हा आम्ही सर्व पदाधिकारी ऊस उत्पादक सुविधा समितीचा राजीनामा देत असल्याचेहीत्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाळ्यातील आरोग्य

Mrityu Panchak 2026: काळजाचा थरकाप उडवणारे 5 दिवस! मृत्यू पंचकाचा थरार; 5 राशींवर घोंगावणारं मोठं संकट

Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

SCROLL FOR NEXT