Summer Heat Dainik Goamantak
गोवा

Summer Heat: यंदाचा उन्हाळा अतिशय उष्ण; गोव्यात एप्रिलमध्ये 1-2 दिवस उष्ण लाटेची शक्यता

Summer Heat: यंदाचा उन्हाळा देभरातच अतिशय उष्ण ठरणार असून तापमान वाढण्याची शक्यता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Summer Heat

यंदाचा उन्हाळा देभरातच अतिशय उष्ण ठरणार असून तापमान वाढण्याची शक्यता आहे. गोव्यात यंदाचा एप्रिल अधिक उष्मा ओकणारा ठरण्याची शक्यता असून राज्यात एप्रिलमध्ये एक ते दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

राज्यातील सर्वसामान्य कमाल तापमान हे ३३ ते ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस आहे, परंतु यंदा ते वाढण्याची शक्यता आहे. ज्यावेळी कमाल तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत ४.५ अंश सेल्सिअसने अधिक वाढते, त्यावेळी उष्णतेची लाट मानली जाते.

राज्यातील कमाल तापमान ३७ अंश किंवा त्याहून अधिक असते, तेव्हा उष्णतेची लाट समजली जाते. राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात उष्मा वाढणार असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, तसेच खास करून लहान मुले व आजारी व्यक्तींची योग्य काळजी घेण्याचे आवाहन वेधशाळेद्वारे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'लग्नापूर्वी मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये, मी बायसेक्शुअल आहे", 'लॉक अप 2'मध्ये आकांक्षा चमोलाचा मोठा खुलासा

Goa politics: विरोधी पक्षांसोबत युतीसाठी 'आप' तयार, स्‍थानिक पदाधिकाऱ्यांना केंद्रीय समितीची मंजुरी; केजरीवालांच स्पष्टीकरण

खरी कुजबुज: आजी-माजी प्रदेशाध्यक्ष शेजारी-शेजारी!

Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून; मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता

Goa Housing Society: सोसायटीतील भांडणं, तक्रारी आणि वादांना मिळणार पूर्णविराम! सरकार स्थापन करणार 'सहारा' प्राधिकरण

SCROLL FOR NEXT