IFFI 2022 Dainik Gomantak
गोवा

Iffi 2022 : यंदाच्या ‘इफ्फी’त सर्वाधिक जागतिक प्रीमियर

यंदा सर्वाधिक चित्रपटांचे जागतिक प्रदर्शन (वर्ल्ड प्रीमियर) होईल. यावर्षीचा कंट्री फोकस म्हणून फ्रान्स असून तेथील अनेक मान्यवर दिग्दर्शकांचे चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होतील.

आदित्य जोशी

Iffi 2022 : पणजीत 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणारा भारताचा 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा अधिक व्यापक करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या मदत घेण्यात येईल. यंदा सर्वाधिक जागतिक प्रीमियर होतील. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 दिग्दर्शकांचे कलात्मक काम रसिकांना पाहता येईल, अशी माहिती पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक सत्येंद्र प्रकाश यांनी दिली.

‘इफ्फी’च्या आयोजनाबाबत बैठकीसाठी ते गोव्यात आले आहेत. यावेळी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक रामाकृष्णन, पीआयबीच्या पश्‍चिम विभागाच्या महासंचालक मोनदीपा मुखर्जी, अतिरिक्त महासंचालक (माध्यम सुविधा) प्रज्ञा पालिवाल-गौर, उपसंचालक गौतम एस. कुमार, एनएफडीसीचे उप महाव्यवस्थापक बालाजी आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सत्येंद्र सिंग म्हणाले, यंदा सर्वाधिक चित्रपटांचे जागतिक प्रदर्शन (वर्ल्ड प्रीमियर) होईल. यावर्षीचा कंट्री फोकस म्हणून फ्रान्स असून तेथील अनेक मान्यवर दिग्दर्शकांचे चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होतील.

पणजीत होणाऱ्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इफ्फी (IFFI) ‘इंडियन पॅनोरमा’अंतर्गत दाखवल्या जाणार असलेल्या 25 फिचर फिल्म आणि 20 नॉन फिचर चित्रपटांची घोषणा महोत्सव संचालनालयाने केली आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या इफ्फीत पाच मराठी, तर एका कोकणी चित्रपटाचा सहभाग आहे.

‘इंडियन पॅनोरमा’तील उद्‍घाटनाचा चित्रपट म्हणून पृथ्वी कोनानूर दिग्दर्शित ‘हादीनेलेंतू’ या कन्नड चित्रपटाची निवड केली आहे. अलीकडे केंद्र सरकारच्या (Central Government) माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या भारतीय चित्रपट विकास महामंडळाच्यावतीने (एनएफडीसी) ‘इंडियन पॅनोरमा’चे आयोजन केले जाते.

‘इंडियन पॅनोरमा’अंतर्गत सिनेमॅटिक, थिमॅटिक आणि सौंदर्यशास्त्रीय पातळीवर उत्कृष्ट असणारे सिनेमे सिनेजगतातील नामवंत व्यक्तींमार्फत निवडले जातात. यंदा ‘फीचर फिल्म’ परीक्षकांचे नेतृत्व प्रख्यात दिग्दर्शक आणि संपादक विनोद गणात्रा यांनी केले. याशिवाय सि ए. कार्तिक राजा, आनंद ज्योती, डॉ. अनुराधा सिंह, अशोक कश्यप, एनुमुला प्रेमराज, गीता एम. गुरप्पा, इमो सिंग आदींचा सिनेमा परीक्षण सदस्यांत समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT