expensive due tubers Effect rain damage crop dainikgomantak
गोवा

Goa News : यंदा कंदमुळे महागणार!

पावसाचा परिणाम : काटेकणगा, अळूची माडी दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : वेळी-अवेळी पडणाऱ्या पावसामुळे अळूची माडी, काटेकणगा आदी कंदमुळांच्या पिकावर यंदा विपरित परिणाम झाला आहे. पीक कमी आल्‍याने ही कंदमुळे सध्‍या महाग झालेली आहेत. काटेकणगा १०० रुपये प्रतिकिलो तर अळूची माडी ६० ते १५० रुपये प्रतिनग या दराने विकली जात आहे. तरीही या कंदमुळांना मोठी मागणी आहे हे विशेष. कर्नाटकातील या कंदमुळांचे आता डिचोलीत दर्शन होऊ लागले आहे.

आज बुधवारी साप्ताहिक बाजारात प्रचंड प्रमाणात नसली तरी अळूची माडी, काटेकणगा, सुरण ही कंदमुळे विक्रीस आली होती. सत्तरी तालुक्यातील काही भागांतूनही कंदमुळे बाजारात आली होती. अळूच्या माडया मध्यम आणि लहान आकाराच्या होत्या. प्रमाण कमी असल्याने सायंकाळपर्यंत बराचसा माल विक्री झाला होता.

यंदा कर्नाटक राज्यात अनियमित पाऊस पडल्याने कंदमुळे जमिनीतच कुजून गेली आहेत. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा कंदमुळांचे पीक कमी आले, असे जांबोटी येथील एक विक्रेता नागू फोंडेकर याने सांगितले..

कर्नाटकातील कंदमुळांची चलती

गेल्या काही वर्षांपासून कर्नाटकातील जांबोटी, कणकुंबी आदी भागातील कंदमुळांनी डिचोली बाजारपेठेत जम बसविला आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी तर कर्नाटकातील कंदमुळांचा खास बाजारही भरत असतो. डिचोली बाजारात उपलब्ध होणाऱ्या कंदमुळांपैकी सरासरी ७० टक्के कंदमुळे कर्नाटक राज्यातून येत असतात. स्थानिक विक्रेतेही घाऊक दराने कंदमुळे विकत घेऊन त्यांची विक्री करतात. दिवाळी झाली की ग्राहकही आठवडी बाजाराच्या दिवशी खास कंदमुळे खरेदीसाठी डिचोलीत येतात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: गोव्यातील व्हिलांमधून 900 कोटींचे कथित सायबर रॅकेट! मुंबई पोलिसांची कारवाई; 22 जणांना अटक

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT