Currency Collector Dainik Gomantak
गोवा

Currency Collector: गोव्यातील 'या' व्यक्तीकडे आहेत 150 देशांमधील चलन, एक हजार किलो दुर्मिळ नाणी..

त्यांचे कुतुहूल हाच त्यांचा छंद बनला

गोमन्तक डिजिटल टीम

रोजच्या रुटीन लाईफ मधून विरंगुळा मिळण्यासाठी प्रत्येकाकडे काही ना काही छंद हवाच. कुणाला तिकिटे जमवण्याचा, कुणाला वेगवेगळ्या वस्तू जमवण्याचा तर कुणाला पुस्तके संग्रही ठेवण्याचा छंद असतो. कुडचडे येथील एका अवलियाने असाच एक छंद जोपासलाय. साहजिकच या छंदामुळे तो आता गोव्यात प्रसिद्धीला येऊ लागलाय. या अवलियाच नाव आहे शेखर नाईक. (The currency collector of Goa)

(The currency collector of Goa)

कुडचडे येथील शेखर नाईक यांना वेगवेगळ्या देशातील तसेच महाराजा यांच्या जमान्यातले पैसे गोळा करण्याचा छंद असून त्यांच्याकडे 150 देशातले वेगवेगळ्या पुरातन चलनी , तर 1000 किलो दुर्मिळ नाण्याचा संग्रह आहे. त्यांनी ही नाणी 10 ते 12 अल्बम करून जपून ठेवली आहेत. अवध्या दहा वर्षाचे असताना शेखर नाईक यांना आपल्या वडिलोपार्जित किराणा दुकानावर आलेल्या लोकांनी दिलेली नाणी न्याहाळताना कुतूहल निर्माण झाले.

पुढे त्यांचे हेच कुतुहूल त्यांचा छंद बनला. आजच्या घडीला त्यांच्याकडे नाण्याच्या संग्रहरुपी अनमोल संपत्तीचा साठा असून पहिल्या शतकापासून ते आजच्या काळात चालत असलेल्या नोटा तसेच नाण्यांचे कलेक्शन आहे. ही सगळी नाणी त्यांनी लॅमिनेटेड शीटमध्ये गुंडाळून, सविस्तर माहितीसह व्यवस्थित जपून ठेवली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sawantwadi Gambling Raid: सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर सावंतवाडीतील 4 मटका-जुगार अड्ड्यांवर धाड; 8 जणांवर कारवाई

Nepal President Resigned: पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यानंतर राम चंद्र पौडेल यांनी दिला राष्ट्रपती पदाचा राजीनामा; नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप!

Viral Video: माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, अर्थमंत्र्याला रस्त्यावर पळवून दिला चोप; नेपाळमधील भयावह व्हिडिओ पाहा

Akshay Kumar Property: मॉरिशस, कॅनडा आणि गोव्यात आलिशान व्हिला... 2,500 कोटींची संपत्ती आणि गाड्यांचा ताफा; 'अशी' आहे बॉलीवूडच्या 'खिलाडी'ची जीवनशैली

आमका आयआयटी नाका! कोडार येथे प्रकल्प नको म्हणून ग्रामस्थ एकवटले Watch Video

SCROLL FOR NEXT