BJP Dainik Gomantak
गोवा

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी हे सरकार अपयशी ठरले!

सरकारच्या कल्याणकारी योजनांचे आर्थिक सहाय्य हे सरकार वेळेवर देऊ शकत नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजप (BJP) सरकार कोविड काळात लोकांना पुरेशा सुविधा देण्यात, तसेच महागाईवर नियंत्रण ठेवण्‍यात अपयशी ठरले आहे. वेळोवेळी विविध योजनांच्या घोषणा करून लोकांना आकर्षित करण्याचे या सरकारने चालविले आहे त्याला बळी पडू नका. सरकारच्या कल्याणकारी योजनांचे आर्थिक सहाय्य हे सरकार वेळेवर देऊ शकत नाही. हे आर्थिक सहाय्य मिळणारे लाभार्थी हे गरीब तसेच सामान्य कुटुंबातील असून त्यांना हा आधार वेळेत देण्यास सरकार अपयशी ठरले आहे, असे मत काँग्रेसचे नेते व माजी महापौर उदय मडकईकर यांनी व्यक्त केले. सांपाल मार्केटातील फळ-भाजी विक्रेते तसेच मच्छिमारी विक्रेत्यांना काँग्रेसतर्फे आज संध्याकाळी 6 ते रात्री उशिरापर्यंत म्हारगायचो जागोर ही मोहीम राबविण्यात आली.

माजी मंत्री संगीत परब यांच्या उपस्थितीत आज ताळगाव येथील सांपॉल मार्केटात ‘म्हारगायचो जागोर’ अभियान राबविण्यात आले. केंद्र व राज्य सरकारने सामान्य लोकांवर लादलेली महागाई यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी ताळगावचे काँग्रेसचे नेते टोनी रॉड्रिग्ज व उदय मडकईकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्त्यांचा समावेश होता. गेल्या आठवड्यात राज्यभर सुरू असलेल्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून आज समारोप झाला.

मडकईकर पुढे म्हणाले, राज्यात जीवनावश्‍यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्र व राज्य सरकारने इंधनाचे दर शंभर कमी करून शंभर रुपयांच्या आत आणले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याने हे तात्पुरते दर कमी केले आहेत, त्यामुळे लोकांनी त्याला भुलून जाऊ नये.

यावेळी ताळगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज म्हणाले की, या मतदारसंघातील आमदार मतदारांना भेटण्यास उपलब्ध होत नाहीत. सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अर्जावर या मतदारसंघातील आमदाराच्या सह्यांसाठी कित्येक दिवस वाट पाहावी लागते त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. ताळगावातील शेती व डोंगरफोड प्रकरणे सुरूच आहेत मात्र त्याकडे स्थानिक आमदार दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे लोकांना याविरुद्ध आवाज उठविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यावेळी लोकांनी त्यांच्या समस्या जाणून घेणाऱ्या तसेच त्यांना लगेच उपलब्ध होऊ शकणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा द्या, असे आवाहन रॉड्रिग्ज यांनी केले.

सांगेत आज जनजागृती

सांगे काँग्रेस (Congress) गट समितीतर्फे 23 रोजी मतदारसंघात जनजागृती आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता दांडो येथील पेट्रोल पंपा जवळ सुरुवात करण्यात येणार आहे, अशी महिती सांगे काँग्रेस गटाध्यक्ष जितेंद्र नाईक यांनी दिली. या वेळी या मतदारसंघातील प्रत्येक घराला भेट देऊन भाजपा कार्यकाळातील भ्रष्टाचार व महागाई संदर्भातील माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT