काणकोणातील काटे कणगा विक्रिसाठी बाजारात Dainik Gomantak
गोवा

'या' एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न...

मशागत व मेहनत कमी असल्याने शेती बरोबरच या पिकाकडे शेतकऱ्याचा (Farmer)कल वाढत आहे.

दैनिक गोमन्तक

काणकोण: दसरा (Dussehra) झाल्यानंतर दिपावलीचे वेध सुरू होतात. या काळात या मातीत पिकवल्या जाणाऱ्या कंदमुळेचे सेवन आरोग्यदायी मानले जाते.त्यामुळेच दिपावलीचा सण जवळ आल्यानंतर काटे कणगा, झाड कणगा बाजारात उपलब्ध होतात. नगदी पीक म्हणून गेल्या पांच वर्षापासून काणकोणात काटेकणगाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

या पिकातून वर्षाकाठी एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेणारे शेतकरी काणकोणात आहेत. काटेकणगाचे सर्वाधिक उत्पन्न खोतीगाव,गावडोंगरी व श्रीस्थळ पंचायत क्षेत्रात घेतले जाते.सद्या काटेकणगाचा प्रति किलो दर 70 ते 80 रूपये आहे.

पूर्वी गोवा बागायतदार (Goa horticulturist) संस्थेकडून काटेकणगाची घाऊक खरेदी केली जात होती.सद्या काटेकणगाना म्हापसा व अन्य बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.पावसाळ्यापूर्वी माळरानावर किंवा पाण्याचा निचरा होणाऱ्या शेतजमिनीत वाफे तयार करून काटे कणगाची लागवड केली जाते.

वेली तयार झाल्यानंतर त्यांना काठीचा आधार दिला जातो.सुमारे सहा महिन्यांत काटेकणगाची काढणी केली जाते.मशागत व मेहनत कमी असल्याने शेती (Agriculture) बरोबरच या पिकाकडे शेतकऱ्याचा कल वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT