GST Dainik Gomantak
गोवा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे गोव्यातील जीएसटी संकलनावर परिणाम

कोरोनाकाळात व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेमुळे गोव्याला आर्थिक फटका बसला. परिणामी राज्याच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात फेब्रुवारी महिन्यात 6% ची माफक वाढ नोंदवली गेली, असे सरकारने मंगळवारी जाहीर केले.

फेब्रुवारीतील राज्याचा एसटी महसूल 364 कोटी आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची (COVID-19) तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली. मात्र, तोपर्यंत राज्यातील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. कोरोनाकाळात हॉटेल्स (Hotel), बार, रेस्टॉरंट्स, स्पा, कॅसिनो यांच्यावर 50% आसन क्षमतेचे निर्बंध लादण्यात आले.

डिसेंबर 2021 मध्ये तेजीत सुरू असलेल्या पर्यटनाला तिसऱ्या लाटेमुळे मोठा फटका बसला. हॉटेल्सची बुकिंग रद्द झाली, फ्लाइटचे आगमन कमी झाले आणि अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले. याचा थेट परिणाम जीएसटी (GST) संकलनावर झाला, ” असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ होत आहे. परिणामी मार्च महिन्याच्या जीएसटी संकलनात वाढ होईल, असा कर अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT