Goa Drugs|Arrest Canva
गोवा

Goa Drugs Case: रेल्वेतून गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा गोव्यात पर्दाफाश! ओडिशा रॅकेटमधील तिसऱ्या संशयिताला अटक

Goa Drugs News: अजित जेना याच्या चौकशीतून संशयिताने यापूर्वी चारवेळा गोव्यात गांजा पुरवठा केलेला असून ओडिशातील एक व्यक्ती त्याला गांजा पुरवठा करत असल्याचे सांगितले

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गांजा तस्‍करी प्रकरणात कुडचडे पोलिसांकडून तिसऱ्या संशयिताला अटक केली असून त्‍याला तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे.

या संशयिताचे नाव रिचू महेंद्रन पिल्लई असे असून तो मडगाव येथे राहणारा आहे. ओडिशावरून आलेला अमलीपदार्थांची पार्सले घेउन त्याचे वाटप गोव्यात करण्याचे काम तो करायचा याची माहिती मिळाल्यावर त्याला अटक करण्यात आलेली आहे.

काही दिवसांपूर्वी कुडचडे रेल्वे स्थानकाबाहेर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या अजित जेना याला गांजासह अटक केल्यानंतर मुख्य पुरवठा करणारा संशयित अक्षय बिसवाल याला ओडिशातून अटक करण्यात आली होती. आता या रॅकेटमधील तिसरा संशयित व माल वाटप करणाऱ्या रिचू महेंद्रन पिल्लई (३३, रा. आके मडगाव) याला अटक करण्यात आली आहे.

कुडचडे पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कुडचडे रेल्वेस्थानकाबाहेर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या संशयित अजित कुमार जेना (मूळ रा. कुबेरा, ओडिशा) याला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेण्यात आली असता संशयिताकडील दोन बॅगेतून ८.४७२ किलो गांजा जप्त करण्यात आला. याची बाजारभावानुसार किंमत ८.४७ लाख रुपये इतकी आहे.

अजित जेना याच्या चौकशीतून संशयिताने यापूर्वी चारवेळा गोव्यात गांजा पुरवठा केलेला असून ओडिशातील एक व्यक्ती त्याला गांजा पुरवठा करत असल्याचे सांगितले. संशयित जेना याची न्यायालयाकडून अटीशर्तीवर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.

५० हजारांचा जातमुचलका व तेवढ्याच किमतीचा हमीदार, वास्तव्याचा पत्ता, संपर्काचा नंबर देणे परवानगीशिवाय गोवा सोडून न जाणे अशा अटी घातल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी संशयित जेना याने दिलेल्या माहितीच्या आधारे अक्षय कुमार बिसवाल (३८, रा. भद्रक, ओडिशा) याला ओडिशातून ताब्यात घेत त्यानंतर अटक केली.

मानवी साखळीद्वारे तस्‍करी

संशयिताला या गांजा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने ओडिशातून गोव्यात अमलीपदार्थ मानवी साखळीद्वारे रेल्वेतून होत असल्याचे उघड झालेले आहे. या प्रकरणी

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडचडे पोलिसांकडून आणखीही सखोल तपास केला जात आहे.

गांजा आणण्यात हात

संशयित अक्षय कुमार हाच ओडिशातून गोव्यात मानवी साखळीद्वारे गांजा गोव्यात आणत असल्याचे पोलिस तपासात झघड झाले आहे. संशयित अक्षय कुमार न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली होती. पुढील तपास कुडचडे पोलिस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT