Thieves steal tires of car after accident in Goa Dainik Gomantak
गोवा

कुचेलीत अपघातग्रस्त कारची चारही चाके लंपास; 24 तासांत दुसरी घटना

कुचेलीत अपघातग्रस्त गाडीची चाके चोरीस गेल्याने परिसरात अट्टल चोरांची टोळी फिरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

शिवोली : रविवारी पहाटे कुचेली-म्हापसा येथे अपघातात सापडून तिघांचे जीव घेतलेल्या कर्नाटक पासिंग कारचे चारही टायर बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. (Thieves steal tires of car after accident in Goa)

खोब्रावाडा-कळंगुट येथे बुधवारी रात्री असाच प्रकार घडला होता. या घटनेला चोवीस तास उलटण्यापूर्वीच कुचेलीत अपघातग्रस्त गाडीची चाके चोरीस गेल्याने परिसरात अट्टल चोरांची टोळी फिरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कुचेली-म्हापसा तसेच करासवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा भंगार अड्डे निर्माण झालेले आहेत सध्या हे अड्डे पोलिसांच्या रडारवर असून लवकरच चोरट्यांचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले. रविवारी पहाटे झालेल्या अपघातात तिघा तरूणांचा जागीच मृत्यू झाला होता.

वाहन चालकाने गाडी चालवताना दक्ष असावे. त्याची झोप पुरेशी झाली नसल्यास त्याने दिवसा किंवा रात्रीच्‍यावेळी दूरचा रस्ता गाठायचा असल्यास धोका पत्करू नये. अनेकदा चालक गाडी चालवून दमलेले असतात. गाडी चालविताना जर चालकाला वाटले झोप येत आहे किंवा आरोग्य ठीक नाही तर त्वरित त्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवावी. जर झोप येत असेल तर त्याने गाडीतच काही तास झोप घ्यावी किंवा आरोग्य ठीक नसल्यास मदत घ्यावी. वेळेत पोहचायचे म्हणून घाई करू नये.

- प्रबोध शिरवईकर, उपअधीक्षक, वाहतूक पोलिस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘तुला गोव्‍याचा राखणदार व्‍हायचे आहे का'? चाकू दाखवला, मारायला सुरुवात केली; हल्ल्‍यादिवशी नेमके काय घडले? काणकोणकरांनी दिला जबाब

Amit Shah Goa: 'पर्रीकरांची आठवण, काँग्रेसला चिमटे, स्वदेशीचा नारा'; अमित शहांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे वाचा..

'बुकवर्म': गोव्याच्या बालवाचनाला नवी दिशा; शंभरहून अधिक शाळांमध्ये 'साक्षरता क्रांती'

Horoscope: आर्थिकदृष्ट्या दिवस लाभदायी, घरात शुभकार्याचे वातावरण; गुंतवणुकीसाठी वेळ योग्य

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

SCROLL FOR NEXT