Siolim Theft News  Dainik Gomantak
गोवा

Siolim Theft News: चार लाखांचे सोने चोरट्यांनी केले लंपास; शिवोली येथील घटना

Siolim Theft News: हणजूणच्या पोलिसांत तक्रार दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

Siolim Theft News: मार्ना-शिवोली येथील मुख्य रस्त्याला लागून असलेल्या बंद घरात घुसून चोरट्यांनी कोलकाता येथील भाडेकरूंचे अंदाजे चार लाख रुपयांचे सोने लंपास केल्याची तक्रार हणजूणच्या पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. ही चोरी मंगळवारी (ता.१८) रात्री पाऊस सुरू असताना झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

या घराचे मूळ मालक गोमंतकीय असून सध्या ते कामानिमित्ताने लंडनला कुटुंबीयांसमवेत राहतात. त्यांनी आपले घर कोलकाता येथील अनुसया सेनगुप्ता तसेच यशदीप शर्मा यांना भाड्याने दिले होते. खासगी चित्रीकरणाच्या निमित्ताने या घरात अनेकांचे येणे-जाणे होते. त्यामुळे हणजूण पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगळ्या दिशेने वळविली आहेत.

दरम्यान, माहिती मिळताच हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रशाल देसाई पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले व श्वानपथकाच्या मदतीने चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT