Bicholim Burgaly Dainik Gomantak
गोवा

Bicholim Office Burglary: डिचोलीत चोरांचा सुळसुळाट! एकाच इमारतीतील 8 कार्यालये फोडली...

मंगळवारी रात्रीची घटना; स्थानिकांमध्ये घबराट, चोरीच्या घटनांनी खळबळ

गोमंतक ऑनलाईन टीम

Bicholim Office Burglary: डिचोलीत एकाच इमारतीमधील आठ ऑफिसेसमध्ये एकाच रात्रीत चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील वासुदेव आर्केड या इमारतीत हा प्रकार घडला आहे. बुधवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

या चोरीतून नेमका काय आणि किती मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे, याची माहिती पोलिस घेत आहेत. दरम्यान, एकाच वेळी आठ ऑफिसेस फोडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला जात आहे.

बोटांचे ठसे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिस चोरांचा माग काढत आहेत. त्यासाठी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले आहे. आठही कार्यालयात तपासणी केली जात आहे. हा परिसर एरवी गजबजलेला असतो.

मंगळवारी रात्री उशिरा चोरीचा हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. या धाडसी चोरीत चोरट्यांच्या हाती मोठे घबाड लागलेले नाही. वकील आदी व्यावसायिकांची ही आस्थापने आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT