thieves broke into 10 cars and stole goods in Mapusa  Dainik Gomantak
गोवा

म्हापशात चोरट्यांचा धुमाकूळ; एक-दोन नाही तर 10 कार फोडल्या

म्हापशात झालेली ही चोरी गुरुवारी 19 ऑगस्ट रोजी रात्री ते शुक्रवारी 20 रोजी पहाटेच्या दरम्यान घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: म्हापसा (Mapusa) शहर, फेअर आल्त व पर्रा या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या 10 कारगाड्या (Car) फोडून अज्ञात चोरट्यांनी त्यातील सहा लाख रुपये किमतीचे कार स्टीरिओ लंपास केल्याचे म्हापसा पोलिसांनी सांगितले. चोरट्यांनी सर्व गाड्यांची नासधूसही केली आहे. ही चोरी गुरुवारी 19 रोजी रात्री ते शुक्रवारी 20 रोजी पहाटेच्या दरम्यान घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेत या चोरीसंदर्भात फेअर आल्त येथील लिओ सिमॉईस, पर्रा येथील मवीन ब्रिटो व म्हापसा येथील संतोष प्रभू धारवाडकर यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार सादर केली आहे. चोरट्यांनी फेअर आल्त भागात पाच गाड्या फोडल्या असून, सिमॉईस यांची जीए 03 व्हाय 9451 क्रमांकाच्या टोयोटा कारमधील 45 हजारांचा स्टीरिओ चोरला. तसेच, हर्षल दळवी यांच्या जीए 03, वाय 6937 क्रमांकाच्या आय टेन कारमधील सुमारे 50 हजार किमतीचा स्टीरिओ लंपास केला.

रमिता गावस यांच्या जीए 03, झेड 3351 क्रमांकाच्या किया सोनेट कारमधील 45 हजारांचा स्टीरिओ, मायरा डिकॉस्ता यांच्या जीए 03 झेड 1408 क्रमांकाच्या मारुती इग्नीझ कारमधील 50 हजारांचा स्टीरियो, तर प्रकाश केनावडेकर यांच्या जीए03 झेड 2400 क्रमांकाच्या क्रेटा कारमधील स्टीरिओ, मोबाइल व इतर सामान मिळून 1 लाख 82 हजारांचा ऐवज लंपास केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

Goa FDA: तीन महिन्यांत 20.43 लाखांचा दंड; 'एफडीए'ची धडक कारवाई, 2,528 अन्न आस्थापनांची तपासणी

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

VIDEO: देवीची मूर्ती आणताना काळाचा घाला! दुर्गोत्सवाच्या तयारीला गालबोट, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; 21 जखमी

SCROLL FOR NEXT