Margao SGPDA Fish Market  Dainik Gomantak
गोवा

Margao News: उच्‍च न्‍यायालयाने आदेश देऊनही थर्माकाेलच्‍या राशी तशाच

Margao SGPDA Fish Market: पालिका दुर्लक्ष का करते असा स्‍थानिकांचा सवाल

गोमन्तक डिजिटल टीम

उच्‍च न्‍यायालयाने आदेश देऊनही मडगावच्‍या एसजीपीडीएच्‍या होलसेल मासळी मार्केट परिसरात पडून असलेल्‍या थर्माकाेलच्‍या राशी अजूनही तशाच असून त्‍यावर पालिका दुर्लक्ष का करते, असा सवाल स्‍थानिक करत आहेत.

दरम्‍यान, पर्यावरणाला हानिकारक असलेल्या कोणत्याही वस्तूंना मडगाव येथील घाऊक मासळी बाजार परिसरात थारा देण्यात येत नाही, असे सोपो कंत्राटदार राहुल शानभाग यांनी म्‍हटले आहे. मात्र, मार्केटबाहेर कोण काय करतो, त्‍यावर आमचे नियंत्रण नाही, असेही त्‍यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाने एसजीपीडीए घाऊक मासळी बाजार परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कठोर निर्देश देऊनही मडगाव नगरपालिकेला स्‍वच्‍छता राखण्यात अपयश आले आहे. मार्केटला लागूनच आणि मार्केटच्या शेजारी असलेल्या शेतातही मोठ्या प्रमाणात थर्माकोल टाकले जात आहे. याबद्दल स्‍थानिकांनी मडगाव पालिकेकडेही तक्रारी केल्‍या आहेत.

‘ते’ क्षेत्र पालिकेचे!

आम्ही मार्केट परिसरात थर्माकोलचा एक बॉक्सही ठेवू देत नाही. काही माशांचे ट्रक थर्माकोल रस्त्यावर टाकत आहेत आणि जवळच्या शेतात फेकत आहेत. थर्माकोलचे बॉक्स बाजारात आढळल्यास आम्ही दंड करतो. कचरा टाकला आहे ते पालिका क्षेत्र आहे, ताे त्यांना साफ करावा लागेल, असे कॉन्ट्रॅक्टर शानभाग म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

तरुणांसाठी 'म्हजी बायल' योजना! दिवाळीनंतर उडणार लग्नांचे बार; सिधुदत्त कामतांचा मजेशीर Video Viral

डेनियलने 'हणजूण बीच'चा गळा घोटलाय, शिवोलीच्या आमदार गप्प का? लोबोंच्या मुलावर आरोप; RGPची Post Viral

'ऑपरेशन सिंदूर'नंतर जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा पुन्हा सक्रिय, भारताविरुद्ध मोठ्या रॅलीचे आयोजन; गुप्तचर संस्थांची लाहोरवर करडी नजर

Neeraj Chopra: 'गोल्डन बॉय' बनला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुखांच्या हस्ते सन्मान VIDEO

SCROLL FOR NEXT