नवीन वाहतूक कायद्याची तूर्त अंमलबजावणी नाही 
गोवा

नवीन वाहतूक कायद्याची तूर्त अंमलबजावणी नाही

वार्ताहर

दाबोळी: केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक कायद्याची तूर्त तरी ऑक्टोबर महिन्यात अंमलबजावणी करण्यात येणार नाही. याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बरोबर चर्चा करून पुढील वर्षी वाहतूक कायद्याचे नवीन नियम गोव्यात आणण्याचा विचार असल्याची माहिती दाबोळीचे आमदार तथा वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

दाबोळी भाजप कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून राबविलेल्या ‘सेवा सप्ताह’ समारोपच्या कार्यक्रमात वाहतूक मंत्री गुदिन्हो यांनी वरील माहिती दिली. 

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, बोगमाळो पंचायतीच्या सरपंच लॉरेन डिकुन्हा, पंच संकल्प महाले, दाबोळी भाजप गटाध्यक्ष संदीप सुद, दक्षिण गोवा भाजप सचिव संतोष केरकर, चिखली कोमुनिदादचे रेमंड कार्व्हालो, समाजसेवक ब्रह्मानंद पवार, लिगोर मोंतेर यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित  होते. 

पुढे बोलताना मंत्री गुदिन्हो म्हणाले की, केंद्र सरकार वाहतूक कायद्यात नवीन नियम अंमलात आणणार असले, तरी गोव्यात वाहतूक कायद्याची ऑक्टोबर महिन्यात अंमलबजावणी करता येणार नाही. कारण वाढत्या कोरोना संक्रमणामुळे सर्व ती खबरदारी घेऊन राज्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्याबरोबर बैठक आयोजित करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार.  एकूणच राज्यातील वाहन चालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याकडे लक्ष दिले जाणार आहे.

तसेच वाहतूक कायद्यात ऑक्टोबर महिन्यापासून सुरवात न करता जानेवारी २०२१ मध्ये गोव्यात लागू करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

 केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्‍या कल्याणासाठी कृषी विधेयकाला लोकसभेत व राज्यसभेत मान्यता देऊन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी योग्य पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचलले आहे. देशाचा खरा कणा शेतकरी असून त्यांना त्याचा हक्क देऊन केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात क्रांती निर्माण केली असल्याची माहिती शेवटी वाहतूक मंत्री गुदिन्हो यांनी दिली. 

दाबोळी भाजप सेवा सप्ताह समारोप कार्यक्रम दाबोळी भागातील २७ दिव्यांगांना गरजू साहित्य मंत्री गुदिन्हो यांनी भेटवल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदेश भोसले तर आभार प्रदर्शन अनिता थोरात यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT