CM Pramod Sawant X Social Media
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: बाऊन्सर्सची दादागिरी थांबवण्यासाठी विशेष विधेयक लवकरच; मुख्यमंत्री सावंत

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: सध्या राज्य सरकारने बाऊन्सर्सला कुठल्याच श्रेणीमध्ये टाकलेले नाही

गोमन्तक डिजिटल टीम

बिगरगोमंतकीय लोक राज्यात जमिनी, मालमत्ता घेतात आणि नंतर स्थानिक लोकांना बाऊन्सर्सकरवी दादागिरी करतात, असा सूर आज विधानसभेत उमटला. यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापुढे बाऊन्सर्सची कायदेशीर नियुक्ती करण्यासाठी नवीन विधेयक आणायची गरज असल्याचे नमूद केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या राज्य सरकारने बाऊन्सर्सला कुठल्याच श्रेणीमध्ये टाकलेले नाही. मात्र, बाऊन्सर्सची कायदेशीर नियुक्ती आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यात विशेष विधेयक आणण्याची गरज आहे.

आमदार लोबो म्हणाले की, किनारपट्टी भागात बिगरगोमंतकीय भाडेपट्टीवर राहतात. आता तर ही मंडळी गोव्यात जमीन घेऊन त्यावर हक्क गाजवण्यासाठी बाऊन्सर्स आणून स्थानिक लोकांवर बळजबरी आणि दादागिरी करताना दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sand Mining: पारंपरिक रेती उत्खनन प्रश्‍न जटील, सरकारचे प्रयत्‍न फोलच; पत्रव्‍यवहाराला केंद्राकडून प्रतिसाद नाही

Cunculim: कुंकळ्ळीच्या माथी नवी फिशमिल मारू नका! एल्विस गोम्स यांनी मुख्यमंत्र्यांपुढे पत्राद्वारे मांडली प्रदूषणाची व्यथा

Goa Tourism: "गोव्याचे धबधबे खुले, सुरक्षित पर्यटनावर भर" डॉ. देविया राणे यांचे चतुर्थीपूर्वी 'पर्यटकांना' गिफ्ट

Goa Drug Case: 'त्या' स्विगी बॉयची कसून चौकशी सुरू, पोलिसांच्या हाती लागणार नवे धागेदोरे?

Goa Live News: ३० मानसिक आजारी व्यक्ती प्रोव्हेडोरियाच्या स्वाधीन

SCROLL FOR NEXT