Attacked on Tourist in North Goa Dainik Gomantak
गोवा

Anjuna Tourist Attack: संघर्षाला दोन्ही घटक जबाबदार; देशी पर्यटकांच्या गैरवर्तन घटनांत वाढ

दैनिक गोमन्तक डिजिटल

(प्रसाद सावंत)

गोव्यात स्थानिक आणि पर्यटकांत वाद होऊन मारहाणीच्या घटनांत वाढ झाली आहे. याच आठवड्यात स्थानिक आणि पर्यटकांत झालेल्या मारहाणीच्या घटनेची राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत आहे.

जुने गोवा येथे महिला पर्यटकाने सुरक्षा कर्मचाऱ्याला चपलाने मारण्याचा प्रयत्न केल्याची घटनाही गाजली. तर आज वाहनाला ओव्हरटेक केल्याने उद्‍भवलेल्या भांडणाचे रुपांतर हणजूण येथे मारहाणीत झाले. परंतु भविष्यात अशा घटना होऊ नयेत, यासाठी स्थानिक आणि पर्यटकांनी संयमाने वागले पाहिजे.

सुट्टी उपभोगण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी येथील नियम, संस्कृती आणि मूल्यांचा आदर करणे गरजेचे आहे,असे मत पर्यटन उद्योगाशी निगडीत घटकांनी व्यक्त केले.

प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात, कारण टाळी एका हाताने वाजत नाही. हणजूण येथे झालेल्या घटनेत अगोदर पर्यटकांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता हॉटेल व्यवस्थापनाकडून सीसीटीव्ही फुटेज जारी केले असून पर्यटकांकडून वादाला सुरुवात झाल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्थानिक असो, की पर्यटक कायदा हाती घेतला जाणार नाही याची खात्री केली पाहिजे.

पर्यटकांनी गैरवर्तन केल्यास त्याची तक्रार पोलिसांत किंवा संबंधित खात्यात केली पाहिजे, असे मत पर्यटन उद्योगाशी निगडित घटकांनी दै. गोमन्तकशी बोलताना व्यक्त केले. गोव्यात येऊन काहीही केले तरी चालेल, ही पर्यटकांची धारणा घातक आहे. येथे आल्यानंतर नियमांचे उल्लंघन करताना पर्यटकांचे व्हिडियो व्हायरल होणे नित्याचा प्रकार झाला आहे.

"स्थानिक आणि पर्यटकांतील संयम दिवसेंदिवस घटतोय आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या तुलनेत येथे पर्यटन पोलिसांची कमतरता आहे. तसेच पर्यटकांसाठी कोणत्या गोष्टी स्वीकारार्ह आणि त्याज्य आहेत, हे सांगणारे फलक असणे महत्त्वाचे आहे."

"पर्यटकांनी ‘गोवा मे सब चलता है’ असे म्हणून चालणार नाही. शिवाय नवीन विमानतळ सुरू झाल्याने पर्यटकांची संख्याही वाढणार आहे. म्हणून येत्या काळात राज्यासमोर ही प्रकरणे कशी हाताळावीत,याचे मोठे आव्हान आहे."

- नीलेश शहा, अध्यक्ष, टीटीएजी

"पर्यटकांना मारहाण झाल्याची प्रकरणे होत असून स्थानिक आणि पर्यटक जबाबदार आहेत. सुट्टीसाठी इतर राज्यातून किंवा देशातून येणाऱ्या पर्यटकांनी येथील नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच देशी पर्यटकांत उत्तर भारतीय पर्यटकांचे वर्तन आक्रमक असते. त्यामुळे वाद उद्‍भवल्यानंतर स्थानिकही उत्तेजित होतात."

"पर्यटनस्थळ असल्याने राज्यात अशा घटना होणारच. परंतु घडलेल्या घटना टाळता आल्या असत्या, तसेच पोलिसांनीही आपले कर्तव्य योग्यरीत्या पार पाडण्याची गरज आहे."

- सावियो मेशियस, माजी अध्यक्ष, टीटीएजी

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांत 50 टक्के गर्विष्ठ आणि गैरवर्तन करणारे असतात,असा अनुभव आला आहे. येथे आल्यानंतर नियमांचे ते उल्लंघन करतात. रस्त्यावर वाहने थांबवून मद्यपान,मस्ती करणे, किनाऱ्यांवर वाहन घेऊन जाणे.

तसेच पोलिसांनी आणि जीवरक्षकांनी अडवल्यास त्यांना मारहाण करण्याचे प्रकारही पर्यटक करतात. आमच्याकडे धोरण आहे, परंतु पर्यटकांना कायद्याची भीती नाही, त्यामुळे हे प्रकार घडत आहेत.

- क्रूझ कार्दोज, अध्यक्ष, अखिल गोवा शॅक्स मालक संघटन

स्थानिक आणि पर्यटकांनी समानपूर्वक वागले पाहिजे, तसेच पर्यटकांनी येथील नियम, संस्कृतीचे पालन अपेक्षित आहे. काही घटना होणारच आहेत, परंतु गोमंतकीय हे आदरातिथ्य करण्यात अव्वल क्रमांकावर आहेत.

पर्यटकांनी गैरवर्तन केल्यास त्याची तक्रार पोलिसात द्यावी. भारतीय पर्यटक तसे चांगले असतात. कोरोना काळात त्यांनीच पर्यटन उद्योगाला आधार दिला होता.

- गिट्री वेल्हो, हॉटेल व्यावसायिक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

SCROLL FOR NEXT