BJP national mainstream malpractice in Goa Goa Forwards critic on the backdrop of municipal elections Dainik
गोवा

Goa Forward : गोव्याची लूट करायला अजून ४ वर्षे बाकी, एवढ्यातच कुठे राजीनामा? श्रीपाद नाईकांवर खोचक टीका

म्हादईसाठी गरज पडल्यास केंद्रिय मंत्रीपदाचा राजीनामा देणार : श्रीपाद नाईक

Rajat Sawant

केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार श्रीपाद नाईक यांनी म्हादईच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. आपण आणि गोवा सरकार म्हादईला वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणार आहे. म्हादईसाठी गरज पडल्यास केंद्रिय मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास मी तयार आहे अशी भूमिका त्यांनी मांडली होती. श्रीपाद नाईक यांच्या भूमिकेवर आता विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत आहे. ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षाने टीकास्त्र सोडले आहे. याबाबत गोवा फॉरवर्डने ट्विट करत खोचक टीका केली आहे.

श्रीपाद नाईक यांचा राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा भाजपला मूर्खपणाचा वाटत असावा. म्हादईच्या मद्द्यावरुन राजीनामा देणे हे अकल्पनीय वाटते. आत्ताच भाचप सत्तेत आले आहे. गोव्याची लूट करायला अजून ४ वर्षे बाकी आहेत. गोव्यात अजून बरीच संपत्ती विकायची आहे. विश्वासघात करणार्‍यांचा कर्णधार म्हणून खुर्चीला चिकटून बसणे ही नैसर्गिक गोष्ट आहे अशी बोचरी टीका ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षाने केली आहे.

 केंद्र सरकारने म्हादईप्रश्नी दिलेला निर्णय हा एकांगी असून कर्नाटकला झुकतं माप देणारा आहे. गोवा सरकारला तसंच गोव्याला हा निर्णय घेताना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आपण आणि गोवा सरकार म्हादईला वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणार आहे. म्हादईचा तिढा सोडवण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार असून गरज पडल्यास कोर्टातही लढा देणार असल्याचं श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केलं आहे. गोव्याच्या जनतेचं हित आमच्यासाठी प्राधान्य असून कुणाच्या सांगण्यावरुन नाही तर केवळ जनतेसाठीच आपण आज ही पत्रकार परिषद घेत असल्याचं श्रीपादभाऊ म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT