Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: ‘जीएमआर’कडून मोपावर कायमस्वरूपी नोकऱ्या नाहीच

Mopa Airport: ‘चलो पंचायत’मध्ये रवी नाईक यांचे स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

Mopa Airport:

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जीएमआर कंपनी कायमस्वरूपी नोकऱ्या देऊ शकत नसल्याचे मंत्री रवी नाईक यांनी ‘चलो पंचायत’ अभियानावेळी स्पष्ट केले. मोपा विमानतळाच्या हद्दीत स्थानिक पंचायतींना कोणेतेही अधिकार नाहीत.

मोपा विमानतळाच्या आत कसल्याही कामाला स्थानिक पंचायतीच्या कोणत्याही परवान्यांची गरज नाही, असे नाईक यांनी सांगितले. चांदेल ग्रामपंचायतीत ‘चलो पंचायत’ अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्ञानेश्वर वरक यांनी मोपा विमानतळासंबंधी स्थानिक पंचायतींना अधिकार आहेत की नाही, असा प्रश्न विचारला होता, त्यावर मंत्री नाईक यांनी वरील माहिती दिली.

मंत्री नाईक यांच्या या वक्तव्यावरून मात्र आता पेडणेकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मोपावर पेडणेकरांना कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या असल्याचे वक्तव्य अनेकवेळा केले आहे आणि आता त्यांच्या मंत्रिमंडळातीलच एक मंत्री जर असे सांगत असतील तर खरे कुणाचे असा स्थानिकांना प्रश्न पडला आहे.

वरक यांनी सर्वोच न्यायालयाच्या निवाड्यानुसार पंचायतीला अधिकार असल्याचे मंत्र्यांच्या नजरेस आणून दिले. यावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी मंत्री नाईक यांनी दिले.

समस्या सोडविण्याचे आश्‍वासन

स्थानिकांनी उपस्थित केलेले सर्व मुद्दे व त्यांच्या मागण्या नोंद करून घेतल्या असून त्या मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात येतील, असे मंत्री रवी नाईक यांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन सखोल चर्चा करून मोपा विमानतळासंबंधीच्या विविध विषयांवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मंत्री नाईक यांनी यावेळी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT