T Raja Singh 
गोवा

Love Jihad:'...तर देशाचा PM मुस्लिम व्यक्ती असेल, लव्ह जिहाद विरोधातील लढाईत सोबत या'; टायगर यांचे गोव्यातील कॅथलिकांना आवाहन

Vishva Hindu Parishad Goa: गोव्यातील हिंदूंची लोकसंख्या कमी होत असून, मुस्लिमांची संख्या वाढत असल्याचा दावा टायगर राजासिंग यांनी कोला.

Pramod Yadav

कुडचडे: लव्ह जिहादी केवळ हिंदूंना टार्गेट करत नाहीत. मी गोव्यातील ख्रिस्ती बांधवांना आवाहन करतो की त्यांनी केरळ फाईल्स चित्रपट पाहावा. लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू आणि ख्रिस्ती समाजातील मुलींची फसवणूक करतात. कॅथलिक समाजातील नागरिकांनी लव्ह जिहादच्या लढाईत हिंदूंसोबत यावे, असे आवाहन टायगर राजासिंग यांनी केले आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दल, गोवा विभागातर्फे गीता जयंतीनिमित्त शौर्य यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी टायगर राजासिंग बोलत होते. 'मुस्लिम पुरुष लव्ह जिहादच्या नावाखाली दुसऱ्या धर्मातील महिलांना फसवणूक त्यांना लग्नाच्या जाळ्यात अडकवतात. त्यानंतर त्यांना त्यांच्या धार्मिक मान्यता बदलण्यास भाग पाडतात. केरळ फाईल्समध्ये हेच वास्तव दाखवण्यात आले आहे. ख्रिस्ती समाजातील नागरिकांनी देखील लव्ह जिहाद विरोधातील लढाईत हिंदूंना साथ द्यायला हवी.'

'कॅथलिक समाजातील नागरिकांसाठी हिंदंची दारे नेहमीच खुली आहेत. या लढाईत तुम्हा आमचा हात धरुन सोबत या, यामुळे आपली ताकद वाढेल. जिहादी लोकांची संख्या वाढल्यास त्यांच्या आमदार आणि खासदारांची संख्या देखील वाढेल. असे झाल्यास पुढील २० ते २५ वर्षात देशाचा पंतप्रधान हिंदू नव्हे तर मुस्लिम असेल', असे टायगर राजासिंग म्हणाले.

गोव्यातील हिंदूंची लोकसंख्या कमी होत असून, मुस्लिमांची संख्या वाढत असल्याचा दावा टायगर राजासिंग यांनी कोला. असे सुरु राहिल्यास हिंदूंसाठी भविष्यकाळ धोकादायक असेल, असेही राजासिंग यावेळी कार्यक्रमात बोलताना म्हणाले. विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दल, गोवा विभागातर्फे गीता जयंतीनिमित्त काढलेल्या शौर्य यात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT