State Bank Theft Dainik Gomantak
गोवा

State Bank Theft: चोरटा फसला पश्चातापात बुडाला, खांडेपार येथील स्टेट बँकेची मोठी चोरी केली पण...

सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्याने संधीचा फायदा घेत खोलीत घुसला.

गोमन्तक डिजिटल टीम

Khandepar State Bank Theft: फोंड्यातील खांडेपार स्टेट बँकेच्या शाखेत काल मध्यरात्री चोरट्याने ATM समजून पासबूक प्रिंटर मशीन पळवल्याचा प्रकार घडला. या चोरट्याने मशीन पळवून लगतच असलेल्या चौपदरी रस्त्यावर फोडले. पण आताच काहीच न सापडल्याने चोरटा तेथून पळून गेला.

फोंडा पोलिसांत (Ponda Police) याप्रकरणी बँक व्यवस्थापक रोहित विश्वकर्मा यांनी तक्रार दिली असून, पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

खांडेपार येथे स्टेट बँकेची शाखा असून, या शाखा कार्यालयाच्या इमारतीतच एक छोट्या खोलीत ATM व पासबूक प्रिंटर मशीन बसवलेले आहे. दरम्यान, काल मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास चोरटा या खोलीत शिरला. व त्याने ATM समजून पासबूक प्रिंटर मशीनच सायकलवरून पळवून नेले. यावेळी त्याने चेहरा शर्टने झाकल्यामुळे त्याची ओळख पटली नाही.

चोरटा फसला

बँकेच्या शाखा कार्यालयाच्या इमारतीतच एक छोट्या खोलीत ATM व पासबूक प्रिंटर मशीन एकत्रित आहेत. ATM असल्याने खोली कायम खुली असते. सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्याने संधीचा फायदा घेत खोलीत घुसला पण ATM समजून प्रिंटर मशीन पळवले. त्यामुळे हाती काहीच न लागल्याने चोरट्याने स्वत:चीच फसवणूक करून घेतली.

यापूर्वीही फोडले ATM मशीन

तिस्क उसगाव येथील दोन बँकेचे ATM मशीन पळवण्याचा प्रकार आठ महिन्यांपूर्वी झाला होता. चोरी केलेले मशीन तिस्क-उसगाव येथील चौपदरी रस्त्याशेजारीच निर्मनुष्य असलेल्या जागेत फोडण्यात आले होते.

दोन बँकेचे ATM चोरट्यांनी नेले असले तरी दोन्हीपैकी केवळ एकाच बँकेचे ATM फोडण्यात त्यांना यश आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT