Crime News |Goa News Dainik Gomantak
गोवा

Crime News: गोव्याच्या राज्यपालांचे घर फोडणाऱ्या 'रॉबिनहूड'ला पुण्यात अटक

आरोपीकडून एक कोटी एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल पुणे पोलिसांनी जप्त केला आहे.

Pramod Yadav

गोव्याचे राज्यपाल तसेच, तामीनाळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे घर फोडणाऱ्या 'रॉबिनहूड'ला पुण्यात अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, पंजाब, गोवा, तामिळनाडू येथे 69 गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून एक कोटी एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल पुणे पोलिसांनी जप्त केला आहे.

चोरी केलेल्या पैशातून 'रॉबिनहूड'ने गावाकडे विकासकामे केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, त्याची पत्नी बिहारच्या सीतामढीत जिल्हा परिषद सदस्य देखील आहे.

रॉबिन हूड उर्फ मोह्ममद इरफान (33, रा. बिहार ) असे अटक आरोपीचे नाव आहे, पुण्यात त्याला अटक करण्यात आली आहे. रॉबिनहूड'सोबत त्याचे साथीदार शमीम शेख (रा. 34, बिहार), अभ्रार शेख (50), राजू म्हेत्रे (50, दोघे रा. धारावी, मुंबई) यांनाही अटक केली आहे. या आरोपीकडून 01 कोटी 21 लाख रुपयांचा मुद्देमाल पुणे पोलिसांनी जप्त केला आहे.

गुगलवर सर्च करुन हाय प्रोफाईल बंगले, उच्चभ्रू सोसायटीत घरफोडी करायचा विशेष म्हणजे त्याने देशातील अनेक राज्यात चोरी केली आहे.

मुख्य आरोपी रॉबिन हूड उर्फ मोह्ममद इरफान याने चोरी केलेल्या पैशातून 'रॉबिनहूड'ने गावाकडे विकासकामे केली असल्याची माहिती आहे. 'उजाला’ या टोपन नावाने त्याचा बिहारमध्ये वावर आहे.

तमिळनाडूत मुख्यमंत्र्यांच्या घरी चोरी केल्याप्रकरणी त्याच्या तीन साथीदारांना अटक केली होती. व रॉबिनहूड हा फरार झाला होता. या आरोपींनी गोव्याच्या राज्यपालांच्या घरीही चोरी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पुणे पोलिसांनी त्याच्याकडून पुण्यात चोरलेली तीन महागडी घड्याळे आणि विशाखापट्टनम येथे चोरलेली सात किंमती घड्याळ जप्त केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT