Siridao Theft Case dainik gomantak
गोवा

Siridao: लंडनमधून परतला अन् दुसऱ्याच्या घराचे दार तोडून आत घुसला, कारण...

शिरदोणा येथील श्री नागवती केळबाई मंदिराजवळ सकाळी 09 वाजता ही घटना घडली.

गोमन्तक डिजिटल टीम

शिरदोण येथे सकाळी एका घरात विचित्र घटना उघडकीस आली आहे. त्याच गावातील सध्या लंडनवरून परत आलेल्या व्यक्तीने दुसऱ्याच्या घरात प्रवेश करण्यासाठी दरवाजा तोडला त्यानंतर तिजोरीतून कपडेही बाहेर फेकून दिले.

शिरदोणा येथील श्री नागवती केळबाई मंदिराजवळ सकाळी 09 वाजता ही घटना घडली.

शिरदोण येथील कार्लुस अल्फासो यांच्या घरात ही घटना घडली. कार्लुस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी घरात झोपले असताना शिरदोण येथील एका इसमाने त्यांच्या घराचा दरावाजा तोडून घरात प्रवेश केला. सुरूवातीला या व्यक्तीने घराच्या समोरचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, समोरचा तुटत नसल्याने नंतर त्याने मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

त्यानंतर त्याने बेडरूमधील साहित्य बाहेर काढले. त्याच्या मनात कोणता राग आहे, हे माहिती नाही. अशी माहिती कार्लुस यांनी दिली.

दरम्यान, सदर व्यक्ती हा शिरदोण येथील रहिवाशी असून, सध्या तो लंदन येथे स्थायिक असल्याची माहिती कार्लुस यांनी दिली. चोरी करण्यासाठी आलेल्या त्या व्यक्तीने घरातील साहित्य बाहेर काढले पण, त्याला चोरी करण्यासाठी काही मिळाले नाही आणि साहित्याची मोडतोड करून त्याने पळ काढला. असे कार्लुस म्हणाले.

या व्यक्तीविरोधात आगशी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून, सबंधित व्यक्तीविरोधात कारवाई करावी अशी मागणी कार्लुस यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT