Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: सांडपाणी वाहिनीचे काम मेपर्यंत पूर्ण होणार

मंत्री नीलेश काबाल ः चांदर रेल्वेमार्गावरील ओव्हरब्रीजचे उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव येथे जे सांडपाणी वाहिनीचे काम सध्या चालू आहे, ते मे महिन्यापर्यंत पूर्ण केले जाणार आहे. मात्र नावेली मतदारसंघातील काम पूर्ण होण्यास थोडा आणखी अवधी लागू शकेल, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मत्री नीलेश काब्राल यांनी दिले.

आज त्यांच्या हस्ते चांदर येथे रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेल्या नवीन रोड ओव्हरब्रीजचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसेच वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा हे उपस्थित होते.

नावेली येथील काम कंत्राटदाराने मध्येच सोडून दिल्याने या कामास विलंब झाला. मात्र यापुढे अशी कामे अर्धवट सोडणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही विकासकामे लोकांवर थोपवत नाही. लोकांची गरज आणि निकड पाहूनच विकासकामांना प्राधान्य दिले जाते, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी दिले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, चांदर गावातील वारसा महत्त्वाची घरे आहेत, याची जाणीव ठेवून या गावात अवजड वाहतूक येण्यास मज्जाव करावा. रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सार्वजनिक खात्यातून मंजूर झालेली कामे झटपट होतील, यासाठी मंजुरीच्या प्रक्रियेला आणखी थोडी गती द्यावी, अशी विनंती केली.

अंतर कमी होणार

चांदर येथे बांधलेल्या या ओव्हरब्रीजमुळे मडगाव - कुडचडे अंतर पाच किलोमिटरनी कमी होणार असून पूर्वी रेल्वे फाटक बंद झाल्यावर लोकांना तिष्ठत राहावे लागत होते, ते आता बंद होणार आहे.चांदर येथील लोकांचा विरोध लक्षात घेऊन या गावातून जाणारा राज्य महामार्ग प्रकल्पही आम्हीं रद्द केला याकडे काब्राल यांनी लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

Job Offer For Indians: 70,000 भारतीयांसाठी 'या' देशात रोजगाराची संधी! नोकरीच्या ऑफर्स पाहून घाई करू नका; सरकारचा इशारा

Vivo ने लॉन्च केला दमदार 5G स्मार्टफोन! 12GB RAM, 256GB स्टोरेजसह तब्बल 9,020mAh बॅटरी; पाहा फीचर्स अन् किंमत

SCROLL FOR NEXT