Kushavati River Dainik Gomantak
गोवा

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Kushavati River: अवेडे आणि पारोडा पंचायत क्षेत्रातील कुशावती नदीचे पाणी प्रदूषित झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.

गोमन्तक डिजिटल टीम

Kushavati River: अवेडे आणि पारोडा पंचायत क्षेत्रातील कुशावती नदीचे पाणी प्रदूषित झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. गुरुवारी (ता.१६) रात्रीपर्यंत स्वच्छ असणारे पाणी अचानक दूषित झाल्याने ग्रामस्थांनी भीती व्यक्त केली. नदीचे पाणी दूषित झाल्याने परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून, हा प्रकार परिसरातील बांधकाम प्रकल्प किंवा मोठ्या कारखान्याकडून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याबाबत जलस्रोत खात्याला पत्र पाठवून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी नदीचे पाणी गढूळ झाल्याने स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले. कुशावती नदीतील जलचरांसाठी हा मोठा धोका असून, कोणत्या तरी कारखान्यातून रात्रीच्या वेळी सांडपाणी सोडल्याचा संशय व्यक्त होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि नदीवर अवलंबून असलेल्यांच्या आरोग्याचा विचार करून संबंधित खात्याने याप्रकरणी गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दरम्यान, केपेचे आमदार एल्‍टन डिकॉस्ता यांनी या गंभीर समस्येवर त्वरित लक्ष देण्याची ग्वाही दिली. या मुद्यांवर जलस्रोत विभागाशी संपर्क साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रदूषणाच्या स्रोताची चौकशी व्हावी!

स्थानिक ज्यो फर्नांडिस म्हणाले की, या प्रदूषणाच्या स्रोताची चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रदूषणाच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना राबवावी.

स्थानिक विशाल देसाई

म्हणाले की, कुशावती नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी संबंधित खात्याने कृती करण्याची गरज आहे. कुशावती नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक पंचायतींनीही आता पुढाकार घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT