Kuththali Zuari Bridge

 

Dainik Gomantak 

गोवा

नाताळ अन् मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक गोव्यात दाखल; रहदारीचा वाढला ताण

कुठ्ठाळी झुआरी पुलावर वाहतूक रहदारीमुळे चक्का जाम होत असल्याने वाहतूक पोलिसांबरोबर (Police) लोकांची डोके दुखी वाढली आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: नाताळ सण आणि मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांचा ओघ गोव्यात वाढत असून रहदारीचा ताण वाढला आहे. कुठ्ठाळी झुआरी पुलावर वाहतूक रहदारीमुळे चक्का जाम होत असल्याने वाहतूक पोलिसांबरोबर (Police) लोकांची डोके दुखी वाढली आहे. कुठ्ठाळी येथील दुसऱ्या झुआरी पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.

गेल्या आठवड्यापासून वाहतुकीच्या कोंडीचे प्रमाण बरेच वाढले असून वाहने रांगेत उभी करून ठेवावी लागत आहेत. यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. कुठ्ठाळी भागात झुआरी पुलाचे काम सुरू असल्यामुळे सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत वाहतुकीची कोंडी होते. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत वाहतुकीची कोंडी होते. नंतर संध्याकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत वाहचुकीची कोंडी होते. या वाहतुकीच्या कोंडीमुळे कुठ्ठाळीतील झुआरी पुलापासून पणजीच्या दिशेने आगशी ते गोवा वेल्हापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात.

तर मडगावच्या दिशेने जाताना कुठ्ठाळीच्या पुलापासून ठाणे-कुठ्ठाळी ते वेर्णा औद्योगिक वसाहतीपर्यंत वाहनांच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागलेल्या असतात. यावेळेत मडगावहून कुठ्ठाळी मार्गे पणजीला येणे, ही लोकांना डोकेदखी ठरते. धूळ प्रदूषणाचाही वाहन चालकांना जास्त त्रास होतो. या मार्गावर बरेच वाहन चालक पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे वाहनांच्या दुप्पट रांगा लागत असतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन सर्वांना डोकेदुखी ठरते.

कुठ्ठाळीत वाहतुकीववर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस तैनात असले, तरी वाढत्या वाहनांच्या संख्येमळे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमुळे पोलिसांना वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे कठीण होते.वेर्णातील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात कामाला जाणारे लोक सकाळी 8 वाजल्यापासून पणजी मडगाव मार्गावरून प्रवास करीत असतात. दुपारी व संध्याकाळी त्यांच्या दुसऱ्या शिफ्टला सुरूवात होते. औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगारांची गर्दी या वाहतुकीच्या कोंडीचे अन्य एक कारण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

SCROLL FOR NEXT