Goa Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case: पावभाजीसाठी चोराने चक्क आयफोनचा केला सौदा

Goa Theft Case: दिल्लीच्या पर्यटकाचा भन्नाट अनुभव : ‘ट्विटर’वर शेअर केली चित्तरंजक कथा

दैनिक गोमन्तक

Goa Theft Case:

पावभाजी खाण्यासाठी खिशात पैसे नसल्यामुळे दीड लाखाचा आयफोन कोणी दुकानदाराला देईल काय? पण ही अशक्य कोटीतील गोष्ट आपल्या राज्यातच घडली आहे. दिल्लीतील एका पर्यटकाने हा आपला अनुभव ‘ट्विटर’वर शेअर केल्यामुळे तो सर्वांसमोर आला आहे.

दिल्लीतील कार्तिकेय राय हे गोव्यात पर्यटक म्हणून आले होते. जीवाचा गोवा करताना ते किंचित मद्याच्या अमलाखालीही गेले होते. तेथेच वावरणाऱ्या अन्य एका मद्यधुंद माणसाने त्यांच्या दीड लाख रुपयांच्या आयफोनवर हात साफ केला. राय यांना आपला आयफोन चोरीला गेल्याचे नंतर समजले. आयफोनची बॅटरी उतरल्यामुळे ते त्या आयफोनशी संपर्क साधू शकले नव्हते.

पैसे नव्हते, म्हणून दिला आयफोन

आयफोन चोरलेल्या व्यक्तीने घटनास्थळावरून काही किलोमीटर अंतरावरील पावभाजी विक्रेत्याकडे तो आयफोन पावभाजीच्या बदल्यात दिला. कारण त्याच्याकडे पावभाजी खाण्यासाठी पैसे नव्हते. त्या पावभाजी विक्रेत्याने आयफोन आपल्याकडे ठेवून घेतला आणि त्याला पावभाजी दिली. नंतर पावभाजी विक्रेत्याने त्या आयफोनची बॅटरी चार्ज केली. इकडे राय हे आयफोन चोरीला गेल्यामुळे हवालदिल झाले होते.

36 तासांनंतर झाला संपर्क

राय यांचा त्या आयफोनशी तब्बल 36 तासांनंतर संपर्क झाला. पावभाजी विक्रेत्याने एका अज्ञात व्यक्तीने तो आपल्याकडे पावभाजीच्या बदल्यात दिल्याचे कबूल केले. तो आयफोन परत करण्याचेही विक्रेत्याने मान्य केले. राय त्या पावभाजी विक्रेत्याकडे गेले आणि त्यांनी अखेर आयफोन ताब्यात घेतला. ‘गोव्यात असा अनोखा अनुभव मला आला’, असे म्हणत त्यांनी ही चित्तरंजक कथा ‘ट्विटर’वर शेअर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT