Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

प्रस्तर शिल्पाजवळ खाण चालविणाऱ्या संशयिताला जामीन नाकारला

उसगाळीमळ-रिवण येथे संरक्षित प्रस्तर शिल्पाजवळ बेकायदेशीर चिरेखाण चालविण्याचा आरोप असलेल्या कावरे-केपे येथील समीर फळदेसाई याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी फेटाळून लावला.

दैनिक गोमन्तक

मडगाव : उसगाळीमळ-रिवण येथे संरक्षित प्रस्तर शिल्पाजवळ बेकायदेशीर चिरेखाण चालविण्याचा आरोप असलेल्या कावरे-केपे येथील समीर फळदेसाई याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी फेटाळून लावला.

या प्रकरणी केपे पोलिस त्याला अटक करण्याच्या प्रयत्नात असून, संशयित आम्हाला त्याचा घरी सापडला नाही, अशी माहिती केपेचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी दिली.

याप्रकरणी खाण खात्याने केपे पोलिस ठाण्यावर तक्रार दिली होती. केपे पोलिस आपल्याला अटक करतील या भीतीपोटी फळदेसाई यांनी न्यायालयात आपल्याला जामीन देण्यात यावा, असा अर्ज केला होता.

ज्या जागी ही बेकायदेशीर खाण सुरू होती त्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर उसगाळीमळ येथील प्रसिद्ध प्रस्तर शिल्पे असून, ही जागा युनेस्कोच्या वारसास्थळ यादीत समाविष्ट आहे. वृत्तपत्रांनी या खनिजकर्मावर आवाज उठविल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या वृत्ताची स्वेच्छा दखल घेत याचिका सुरू केली होती.

मडगावच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांच्या न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अर्जदार फळदेसाई यांचा अटकपूर्व अर्ज फेटाळला.

या खाणीवर जे जेसीबी मशीन आणि अन्य वाहने सापडली ती फळदेसाई यांच्या नावावर नोंद आहेत. त्यामुळे याप्रकरणी फळदेसाई यांचा काय संबंध आहे हे कळण्यासाठी त्याला अटक करून चौकशी करण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT