Goa police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: काणकोण पोलिसांची मोठी कारवाई; तीन लाखांचा अमली पदार्थ जप्त

ओडिशाच्या संशयिताला केली अटक

दैनिक गोमन्तक

गोवा पोलिसांनी अमली पदार्थावरील आपली कारवाई कायम ठेवत आज एकावर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे तीन लाखाचा अमली पदार्थ जप्त केला आहे. त्यामुळे गोवा पोलिसांच्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

(The South Goa Police team has arrested a citizen of Odisha who was carrying drugs)

मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण जिल्हा पोलीस पथकाने आज कारवाई केली असून या कारवाईत अमलीपदार्थ बाळगणाऱ्या एकाला अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या कारवाईचे नेमके ठिकाण अद्याप समजू शकलेले नाही.

पोलिसांनी सापळा लावत एकाला अटक केली. सत्यबान बहेरा मूळ ओडिशा असे या संशयिताचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी संशयिताकडून सुमारे 3 लाख किमतीचा 3 किलो गांजा जप्त केला आहे. संशयितांची चौकशी सुरु असल्याने अधिकची माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान वेल्हा येथे 2 लाखाचा गांजा जप्त केला असल्याची कारवाई काही तासांपुर्वी घडली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन परदेशी नागरिकांना अटक केली आहे. या कारवाईत 2.10 लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यामुळे गोवा पोलिसांच्या कारवाईचा धडाका सुरुच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT