Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet Meeting: राज्यातील पंच-सरपंचांच्या मानधनात वाढ, कॅबिनेट बैठकीत निर्णय; खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Goa CM Pramod Sawant: राज्यातील सरपंचांना महिन्याला ८ हजार रुपये, उपसरपंचांना महिन्याला ६ हजार ५०० रुपये तर पंचांना महिन्याला ५ हजार ५०० रुपये मानधन मिळणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील सरपंचांना महिन्याला ८ हजार रुपये, उपसरपंचांना महिन्याला ६ हजार ५०० रुपये तर पंचांना महिन्याला ५ हजार ५०० रुपये मानधन मिळणार आहे. त्यांच्या मानधनात सरासरी दोन हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री रोहन खंवटे उपस्थित होते. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारवर या मानधनांचा वार्षिक २ कोटी ६३ लाख रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले, की राज्यातील ११ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जा वाढवण्याचे काम टाटा समूहाच्या आर्थिक सहकार्याने २३० कोटी रुपये खर्चून सरकारने मार्गी लावले आहे. यातील १६० कोटी रुपये टाटा खर्च करणार असून सध्या उपकरणे पुरवण्याच्या स्वरूपात त्यांनी ७५ कोटी रुपये खर्चही केले आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत केवळ नवीन उपकरणे आणली जाणार नसून अभ्यासक्रमांचीही फेररचना होणार आहे. सरकार ७० कोटी रुपये खर्चून या संस्था सुसज्ज बनविणार आहे

विद्यार्थ्यांचा होणार सन्मान

आतिथ्यशीलता अभ्यासक्रमासाठी ताज समूहाबरोबर करार करण्यात आला असून नवीन अभ्यासक्रम १५ जुलैपासून सुरू होत आहे. गुरुवार, ११ जुलै रोजी ‘जागतिक कुशलता दिना’निमित्त कला अकादमीत खास कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात कुशलता अभ्यासक्रमात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT