Casino  Dainik Gomantak
गोवा

कसिनो पुन्हा सुरु केल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळेल: कॉंग्रेस

अशी मागणी गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसद्वारे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई (Governor P.S. Sreedharan Pillai) यांना देण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोनामुळे (Covid 19) बंद असलेले कसिनो (Casino) पुन्हा सुरु केल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ते आमंत्रण ठरेल. त्यामुळे बंद असलेले कसिनो पुन्हा सुरु करण्याची परवानगी देऊ नये. अशी मागणी गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसद्वारे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई (Governor P.S. Sreedharan Pillai) यांना देण्यात आले आहे.

युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर (Varad Mhardolkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार मांडवी नदीत असलेल्या कसिनोवर देश विदेशातील लोक येतात. कसिनो सुरु केल्यास राज्यातील पर्यटाकांची संख्या वाढेल पण त्याचसोबत कोरोनाचा प्रसारही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कसिनो सुरु केले जाऊ नयेत. अशी मागणी कॉंग्रेसच्या युवां समितीने केली आहे.

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संसथेच्या अहवालानुसार कोरोना काळात कसिनो बंद राहिल्यामुळे मांडवी नदीच्या पाण्याचे प्रदूषण कमी झालेले आहे. हे लक्षात घेता कसिनो सुरु केले जाऊ नयेत. दुसरीकडे कसिनो सुरु केल्यास कसिनोवर कोरोना नियमांचे पालन होणार नाही. उलट मांडवी नदीचे प्रदूषणही वाढेल. असे या निवेदनात नमूद केल आहे. ॲड. वरद म्हार्दोळकर व युवा कॉंग्रसचे प्रभारी जनार्दन भंडारी यांनी हे निवेदन राज्यपालांना दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT