Inauguration of Various water Supply Project Dainik Gomantak
गोवा

डिसेंबरपर्यंत गोवा करणार टँकरमुक्त : मंत्री नीलेश काब्राल

धारबांदोडा तालुक्यातील जनतेसाठी जलप्रकल्पाचे लोकार्पण

दैनिक गोमन्तक डिजिटल

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम खाते येत्या डिसेंबरपर्यंत संपूर्ण गोवा राज्य टँकरमुक्त करणार, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी साकोर्डा येथे दिली.

धारबांदोडा तालुक्यात जलजीवन मिशनअंतर्गत 11 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या दाबाळ-कोडली, धाट- मोले व मधलावाडा-साकोर्डा येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाचे लोकार्पण मंत्री काब्राल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

काब्राल म्हणाले की, काणकोण, केपे, सांगे, कुडचडे व सावर्डे हे मतदारसंघ टँकरमुक्त करण्याचे उद्दिष्ट असून या मतदारसंघातील लोकांना जलजीवन मिशनअंतर्गत रोज 4-5 तास शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा उपलब्ध होणार आहे.

या भागातील रगाडा नदीवर बंधाऱ्याची गरज आहे. राज्यातील भाजपचे सरकार लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी सक्षम असल्याचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर याप्रसंगी म्हणाले.

पाणीगळतीचे प्रमाण 40 टक्के

राज्यात पाणीगळतीचे प्रमाण 35-40 टक्के एवढे मोठे असून ते 20 टक्क्यांवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यावर खड्डे दिसणार नाहीत, यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाणी, रस्ते व वीज लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी संबंधित खाते सक्षम आहे का? यावर विचार करावा लागेल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: नागेशीत 'गोविंदा रे गोपाळा'च्या गजरात दही हंडी साजरी

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT