Ration Card Dainik Gomantak
गोवा

Goa Green Ration Card: राज्यात ग्रीन रेशनकार्ड देण्याची प्रक्रिया सुरू; 'या' कुटूंबांना मिळणार नाही धान्य

मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली होती घोषणा

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Green Ration Card: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प सादर करताना ग्रीन रेशनकार्ड देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ग्रीन रेशनकार्ड देण्याची प्रक्रिया आता नागरी पुरवठा खात्याने सुरू केली आहे. पाच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटूंबांना हे ग्रीन कार्ड देण्यात येणार आहे.

केवळ ओळखीचा पुरावा म्हणून या कुटूंबांना ही ग्रीन रेशनकार्ड देण्यात येणार आहेत. कारण या कार्डवर सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून कोणत्याही प्रकारचे धान्य कार्डधारकांना देण्यात येणार नाही. तथापि, रेशनकार्ड बनण्यास अद्याप २ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

संबंधित कुटूंबांना केवळ एक अर्ज दाखल करावा लागेल. दरम्यान, रेशनकार्डे वितरीत केलेल्या खूप काळ उलटून गेला आहे. त्यामुळे आता सर्वच रेशनकार्ड नवीन करून दिली जाणार असल्याचेही कळते.

दरम्यान या योजनेचाच एक भाग म्हणून राज्यातील आत्तापर्यंत दोन हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची रेशनकार्ड परत केली आहेत. तसे आदेश नागरी पुरवठा खात्याने यापुर्वी दिले होते. तथापि, अद्यापही अनेक कुटूंबांनी रेशनकार्ड परत केलेली नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Menkure Gram Sabha clash: ग्रामसभेत पेटली स्मशानभूमी! लोकार्पणाच्या मुद्यावरून मेणकुरेवासीयांत धक्काबुक्की; खुर्च्याही उगारल्या

VIDEO: क्लबबाहेर दोन गटांत राडा! शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, 8 जण अटकेत; पाटो पणजीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Weather Update: गतवर्षीच्‍या तुलनेत पाऊस 28.43 इंचांनी कमीच, सरासरी पर्जन्यमानातील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांवर; हवामान विभागाचा निष्कर्ष

Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT