Kolwa Circle News Dainik Gomantak
गोवा

कोलवा सर्कलकडे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर!

उपाययोजना कुचकामी : योग्य तोडगा काढण्याची प्रवाशांची आग्रही मागणी

दैनिक गोमन्तक

सासष्टी: मडगावच्या जुन्या बाजारातील कोलवा सर्कलकडे वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. यावर उपाय म्हणून फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी वाहतूक सिग्नल्स बसवले होते. नंतर चार रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या वाहतूक बेटाचा आकार कमी केला होता. तरीही त्यात सुधारणा झालेली नाही, त्यामुळे नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

(The problem of traffic jam at Kolwa Circle is serious)

नुकतीच आमदार सरदेसाई, पोलिस अधिकारी व वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे या भागाची पाहणी केली. त्यानंतर मडगावला जाणाऱ्या बाजूला जो अडीच-तीन मीटरचा पदपथ आहे तो कापून छोटा करावा, असे ठरले होते. मात्र अद्याप काही हालचाल होताना दिसत नाही. यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बसेस थांबतात भलत्याच ठिकाणी

कदंब बसस्थानकावरून सुटलेल्या बसेसचा पुढचा थांबा एकदम होली स्पिरीट हायस्कूलजवळ आहे. तरीही बसेस कोलवा जंक्शनकडे व नंतर पुढे वळसा घेऊन दक्षिण गोवा शिक्षण खात्याच्या (आऊल) कचेरीसमोर थांबतात. त्यामुळेही वाहतूक कोंडी होत असते.

कोंडीची मुख्य कारणे

फातोर्ड्याहून किंवा कदंब बसस्थानकाकडून ज्या बसेस मडगाव शहर मार्गाने जातात त्या मडगाव बाजूच्या रस्त्यावर प्रवाशांना घेण्यासाठी थांबतात.

या बसेस धिम्या गतीने जातात. फातोर्ड्याच्या बाजूला जेव्हा लाल सिग्नल सुरू होते तेव्हा सरळ कोलवा किंवा वळसा घालून पणजी वा वास्कोच्या दिशेला जाणारी वाहने एकाच रांगेने न राहता दोन तीन रांगा होतात. त्यामुळे फातोर्ड्याहून सरळ मडगाव शहरात जाणाऱ्या वाहनांना जाता येत नाही. फोंड्याहून आलेल्या बसेस ज्या कदंब बसस्थानकाकडे जाणाऱ्या असतात त्या प्रवाशांना उतरवण्यासाठी न्यायालय इमारतीच्या समोर थांबा घेतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

Bull Fight Viral Video: रस्त्यावर जनावरांचा थरार अन्...! बैलाची स्कूटीला जोरदार धडक; अंगावर काटा आणणार व्हिडिओ तूफान व्हायरल

Goa RGP: 'गोमंतकीयांचे हित जपणारे सरकार हवे'; बोरकरांचा निर्धार! 'आरजी'च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

SCROLL FOR NEXT