काणकोण पालिका उद्यान Dainik Gomantak
गोवा

Goa: काणकोणमधील उद्यानाला आली अवकळा

गेली दोन वर्षे हॉटेल व्यवस्थापनाने त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण (Canacona) पालिकेच्या पोर्तुगीज कालीन उद्यानाला अवकळा आली आहे. या उद्यानाच्या देखभालीकडे पालिकेचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. काही वर्षे या उद्यानाची (park) देखभाल काणकोण मधील पंचतारांकित हॉटेल द ललित यांच्या तर्फे करण्यात येत होती. यापूर्वी या उद्यानात शोभेच्या झाडांची लागवड विद्युत रोषणाई (Lighting) त्याचप्रमाणे नियमीत देखभाल हॉटेल अस्थापनातर्फे करण्यात येत होती. मात्र गेली दोन वर्षे हॉटेल व्यवस्थापनाने त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे. सद्या गेल्या वर्षापासून कोवीड महामारीमुळे उद्यान बंदच असल्याने उद्यानात झाडी वाढली आहे.

उद्यानात माणसांचा वावर नसल्याने उद्यानात बेडूक व त्यांना भक्ष्य बनवण्यासाठी सापांची संख्या वाढली आहे. त्यासाठी या उद्यानाची झाडे व गवत कापून साफसफाई करण्याची गरज चावडी येथील स्थानिक रहिवासी शंकर नाईक यांनी केली आहे. पासाळ्यापूर्वी चावडी वार्डाचे नगरसेवक रमाकांत नाईक गावकर यांनी वीज तारांवर लोंबकळणाऱ्या झाडांची छाटणी करून घेतली होती.त्यापूर्वी या वृक्षाच्या फांद्याचे वीज तारांना घर्षण होऊन वारंवार या भागाचा वीज पुरवठा खंडीत होत होता.उद्यानात बालकांसाठी झोपाळे, घसरगुंडी व अन्य सोयी आहेत मात्र त्याची देखभाल होत नसल्याने त्यांना गंज चढला आहे.

उद्यानाचे नुतनीकरण करणार

चावडी येथील उद्यान इतिहास कालीन आहे.त्याचे नुतनीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.त्यासंदर्भात पालिका मंडळाने ठराव समंत केला आहे. हा प्रस्ताव जीसुडा यंत्रणेला पाठवून त्याच्या योजनेतून उद्यानाचे नुतनीकरण करण्यात येणार असल्याचे चावडी वार्डाचे नगरसेवक रमाकांत नाईक गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT