Anjuna Crime Dainik Gomantak
गोवा

Anjuna Robbery Case: कर्नाटकचे कपल गेले बीचवर फिरायला; इकडे सुरक्षा रक्षकाने साधला डाव, वाचा काय आहे प्रकरण..

हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा अतुल हा मूळ गावी पळून जाण्याच्या मार्गावर असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले

गोमन्तक डिजिटल टीम

Anjuna Robbery Case: हणजूण येथील एका हॉटेलमध्ये राहणाऱ्या पर्यटकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एकाला हणजूण पोलिसांनी अटक केलीय. अतुल कुमार बैस (रा. मध्य प्रदेश)असे या आरोपीचे नाव असून त्या हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.

या घटनेसंबंधी सविस्तर माहितीअशी कि, कर्नाटक- बंगळूर येथील एक जोडपे सुट्टीसाठी गोव्याला आले होते. हणजूण येथील "गोअराउंड कोझी होम्स" नावाच्या भाड्याने घेतलेल्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये ते राहत होते.

वागातोर समुद्रकिनारी हे जोडपे फिरायला गेल्याची संधी साधून आरोपीने त्यांच्या बंद खोलीत प्रवेश करून सोन्याची चेन व इतर वस्तूंची चोरी (चोरी केलेल्या वस्तूंची अंदाजे रक्कम 1,20,350/- ) केली.

दरम्यान आपल्या वस्तूंची चोरी झाल्याचे समजताच त्या जोडप्याने हणजूण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर नोंदवला. त्यानंतर हणजूण पीआय प्रशाल देसाई यांच्यासहित पोलीस स्टेशनच्या अन्य कर्मचाऱ्यांनी तत्काळ तपास करण्यास सुरुवात केली.

हॉटेलमध्ये तपासा दरम्यान सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा अतुल बैस हा त्याच्या मूळ गावी पळून जाण्याच्या मार्गावर असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

दरम्यान त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्हा काबुल केला. त्याच्या कडून सोनसाखळी आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. आयपीसी कलम 454, 380 अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT